Skip to main content

Posts

परत गांधी आमचे सावरकर तुमचे -

नुकतीच एक बातमी वाचनात आली. ती म्हणजे, राजस्थानमधील अशोक गेहलोत सरकारने १० वी च्या शैक्षणिक अभ्यासक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी एक बदल केला आहे. राजस्थानमध्ये ज्या विचाराचं सरकार येतं, तसे बदल पाठ्यपुस्तकातील इतिहासात होतात. भाजपच्या काळात विस्तारात आणलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या इतिहासाला गेहलोत सरकारने कात्री लावली आहे. जेलमध्ये होणा-या त्रासाला कंटाळून वीर सावरकरांनी ब्रिटीशांकडे चारवेळा दयेची याचिका केली आणि सरकारच्या अनुसार काम करण्याची आणि स्वताला पोर्तुगालचा मुलगा असल्याचं सांगितल्याचा उल्लेख केला. ब्रिटीशांनी सावरकरांची याचिका स्वीकारून १९२१ साली त्यांना जेलमधून मुक्त केले. तिथून सुटल्यावर हिंदूमहासभेत प्रवेश करून देशाला हिंदूराष्ट्र बनविणयाची संकल्पना मांडली. दुस-या महायुद्धाच्या काळात ब्रिटीश सरकारला मदत केली. १९४२ च्या "भारत छोडो" या आंदोलनाला सावरकरांनी विरोध केला होता. तसेच महात्मा गांधींच्या हत्येमधील मुख्य आरोपी नथुराम गोडसेला मदत केल्याच्या आरोपाचाही खटला सुरू होता. त्यातून सावरकरांची मुक्तता झाली, अशा आशयाचा इतिहास शिकवला जाणार आहे. सावरकरांच्...
Recent posts

दोन वाचाळवीर -

दोन तोंडे नको त्यावेळी उचकटली गेली आहेत. एक आहेत मुस्लिमांचे पार्ट टाईम कैवारी मौलाना जावेद अख्तर, आणि दुसरे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे रामभक्त सीताराम येचुरी. हे दोघेही डाव्या विचारांचे असल्यामुळे तोंड उचकटणे हा त्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे. भाषणस्वातंत्र्याबरोबर अभिव्यक्तीस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य, व्यक्तीस्वातंत्र्य हे त्यांचे अधिकार आहेत. विशेष म्हणजे ह्या अधिकारांची डाव्यांनी कधीच कदर केली नाही, नेहमीच त्यांची मुस्कटदाबी आणि अवहेलना केली. आता हे आयते मिळाल्याने फुकटची मिरासदारी मिरवत आहेत ! श्रीलंकेतील बाँबस्फोटानंतर मुस्लिम महिलांच्या बुरख्यावर बंदी घालण्यात आली, केरळमध्येसुद्धा बंदी घालण्यात आली. (केरळमध्ये माकपचे सरकार आहे) ३ मे २०१९ रोजी बुरख्याप्रमाणे घुंघटावर बंदी घालावी अशी हास्यास्पद मागणी मौलाना अख्तरांनी केली. सामनात मुस्लिम महिलांच्या बुरख्यावर मागणी घालावी, असा लेख आल्याने खळबळ माजली. त्यापुर्वी श्रीलंकेत अध्यादेश काढून सार्वजनिक ठिकाणी बुरखाबंदी केली, फ्रान्समध्येसुद्धा बुरखाबंदी आहे ! मुस्लिम महिलांनी बुरखा घालणे किंवा न घालणे हा त्यांचा प्रश्न आहे. अख्तर ह...

मोदींची मुलाखत आणि रविश कुमारांचा जळफळाट -

२३ एप्रिल २०१९ रोजी पंतप्रधानांच्या नवी दिल्लीतील ७ लोककल्याण मार्ग येथील निवासस्थानी अभिनेते अक्षयकुमार यांनी नरेंद्र मोदींची चालती-बोलती मुलाखत घेतली. आणि बुधवारी ती प्रसारित करण्यात आली. नेहमी राजकीय प्रश्नाभोवती घुटमळणा-या साच्याला अक्षयकुमारांनी दूर सारले. "मला सैनिक किंवा संन्यासी व्हायचे होते" असे मोदींनी त्यांच्या बालपणीचे लक्ष्य मोदींनी स्पष्ट केले. आंब्याविषयीचे प्रेम सांगतानाच त्यांनी हलाखीच्या कौटुंबिक परिस्थितीच्या आठवणीही सांगितल्या. देशातील राजकीय क्षितिज व्यापलेल्या आणि २४ तास राजकीय भूमिकेतच वावरणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अराजकीय दर्शन बुधवारी देशवासियांना घडले. बालपणीचा अल्लडपणा, कौटुंबिक स्थिती, जीवनाचे लक्ष्य, योगासनांचा प्रभाव ते झोपेचा त्रास आणि अगदी निवृत्ती जीवनापर्यंतच्या गोड-कटू आठवणी, अनुभव, निर्धार खुद्द मोदी यांच्याच शब्दात उलघडले. ही मुलाखत म्हणजे एकप्रकार स्वकथन केलेला बायोपिकच ठरला. अनेक पत्रकार, राजकारणी ह्यांना ही मुलाखत चांगलीच झोंबली. कोणत्याही राजकारणी, पत्रकारांवर मोदींनी कोणत्याप्रकारे टिकाटिप्पणी केली नव्हती. राहुल गांधी -...

श्री तशी सौ -

मागच्या आठवड्यात शबाना आझमींच्या नावाने एक पोस्ट आली होती. आणि त्यात लिहीले होते कि, मैं इस नवरात्री पर अल्लाह से दुआ करती हुँ की लक्ष्मी को भीख ना मांगनी पडे, दुर्गा की भ्रुणहत्या ना हो, पार्वती को दहेज ना देना पडे, सरस्वती बिना स्कूल के अनपढ ना रहे और काली को फेयर एंड लवली की जरूरत ना पडे ! इंशा अल्लाह !" त्यावर त्यांनी संतापून प्रतिक्रिया दिल्या कि, "मी असे कधीच बोलले नाही. हे फारच घृणास्पद आहे कि, आधीच भडकलेले वातावरण ध्रुवीय आणि जातीय बनवले जात आहे. मी सर्व धर्मातील स्त्रियांसाठी काम करते".(०९ एप्रिल २०१९) शबानाजींचा राग अगदी रास्त आहे, कारण कोणी तुमचे नाव आणि फोटो वापरून सोशल मीडियातून अफवा पसरवत असेल आणि समाजात तेढ निर्माण करत असेल तर राग येणे स्वाभाविक आहे. शबाना आझमींसारख्या उदारमतवादी, धर्मनिरपेक्ष, महान समाजसेविका, ज्या उच्च विचारांच्या पातळीवर राहतात त्यांचे नाव वापरून समाजात ध्रुवीय आणि जातीय वातावरण बनवले जात आहे ! हे नक्कीच नीच आणि गलिच्छ लोक असतील, पण कोण आहेत हे लोक ? हे नक्कीच संघाडे, भाजपाई, भक्ताड, सनातनी असेच लोक असतील. शबानाजी अन्य धर्मीयांच्या कु...

६०० जणांचा व्यापक कट तथा महाकारस्थान -

६ एप्रिल २०१७ रोजी बॉलिवूडच्या ६०० कलाकारांनी एक जाहिरनामा उर्फ फतवा काढला. त्यामध्ये असे लिहीले होते कि, "मतदान करा आणि भाजप व त्यांच्या मित्रपक्षांना सत्तेतून हाकलून लावा". ह्याचे नेतृत्व प्रामुख्याने ज्येष्ठ अभिनेते नासिरूद्दीन शाह, अमोल पालेकर, गिरीश कर्नाड, शांता गोखले, मकरंद देशपांडे, महेश एलकुंचवार, महेश दत्तानी, अरूंधती नाग, कीर्ती जैन, अभिषेक मुजूमदार, कोंकणा सेन-शर्मा, रत्ना पाठक-शाह, अनुराग कश्यप, एम.के.रैना, उषा गांगुली आदी कलाकार करत आहेत. १२ भाषांमध्ये हे पत्र तयार करण्यात आले असून आर्टिस्ट युनायटेड इंडिया या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आले आहे. "भारतीय संविधान धोक्यात आहे, भाजपला मतदान करू नका" असे ह्या पत्रात म्हटले आहे. सध्याची निवडणूक देशाच्या इतिहासातील अत्यंत महत्वाची निवडणूक आहे. आज भारताची सर्वसमावेशक संकल्पनाच धोक्यात आली आहे. आज आमचे नाणे, गाणे, विनोद हे धोक्यात आले आहे. "आज आमचे प्रिय संविधानदेखील ह्या तडख्यातून सुटलेले नाही". असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. खरतरं हा जाहिरनामा उर्फ फतवा काढला म्हणून आक्षेप घेण्याचे वा ...