Skip to main content

श्री तशी सौ -

मागच्या आठवड्यात शबाना आझमींच्या नावाने एक पोस्ट आली होती. आणि त्यात लिहीले होते कि, मैं इस नवरात्री पर अल्लाह से दुआ करती हुँ की लक्ष्मी को भीख ना मांगनी पडे, दुर्गा की भ्रुणहत्या ना हो, पार्वती को दहेज ना देना पडे, सरस्वती बिना स्कूल के अनपढ ना रहे और काली को फेयर एंड लवली की जरूरत ना पडे ! इंशा अल्लाह !" त्यावर त्यांनी संतापून प्रतिक्रिया दिल्या कि, "मी असे कधीच बोलले नाही. हे फारच घृणास्पद आहे कि, आधीच भडकलेले वातावरण ध्रुवीय आणि जातीय बनवले जात आहे. मी सर्व धर्मातील स्त्रियांसाठी काम करते".(०९ एप्रिल २०१९) शबानाजींचा राग अगदी रास्त आहे, कारण कोणी तुमचे नाव आणि फोटो वापरून सोशल मीडियातून अफवा पसरवत असेल आणि समाजात तेढ निर्माण करत असेल तर राग येणे स्वाभाविक आहे. शबाना आझमींसारख्या उदारमतवादी, धर्मनिरपेक्ष, महान समाजसेविका, ज्या उच्च विचारांच्या पातळीवर राहतात त्यांचे नाव वापरून समाजात ध्रुवीय आणि जातीय वातावरण बनवले जात आहे ! हे नक्कीच नीच आणि गलिच्छ लोक असतील, पण कोण आहेत हे लोक ? हे नक्कीच संघाडे, भाजपाई, भक्ताड, सनातनी असेच लोक असतील. शबानाजी अन्य धर्मीयांच्या कुप्रथांवरही तितक्याच कठोरतेने प्रहार करतात ! त्यांचा नावाचा वापर करून समाजात फूट पाडायचे काम हे संघी आणि भक्ताड लोकच करत असतील ! विनोद भरपुर झाला, आता मुद्द्यावर येऊया ! समाजाला व्याख्यान देण्यापुर्वी आणि जातीय, ध्रुवीय असे शब्द वापरण्यापुर्वी आपण सोशल मीडियावर जे काही बोलतो-लिहीतो ते कितीही जुने असले तरी कायमस्वरूपी नोंदणीकृत असते,  ते सहजासहजी मिटवता येत नाही हे लक्षात ठेवले पाहिजे ! ज्यांच्याकडे भरपुर वेळ असतो अशा लोकांनी शबानाजींच्या विधानात किती सत्यता आहे ह्याचा शोध घ्यायला सुरूवात केली. शोध सुरू झाला तेंव्हा २८ सप्टें. २०१७ चे एक ट्विट सापडले ! त्यात लिहीले होते कि, (This durga ashtami lets pray that no durga is aborted, no Sarsawati is stopped from going to school, no Lakshmi  has beg to money from husband, no parwati is sacrificed for dowary and no Kali is given a tube of fairness cream !!! ) हे ट्विट रात्री ११.४१ वाजता केले होते. एक प्रश्न पडतो कि, आपल्या पतीकडे पैसे मागणे म्हणजे भिक मागणे कधीपासून झाले ? शबाना आझमींची पोलखोल झाली. इंडिया टुडे, टाईम्स ऑफ इंडियासारख्या वृत्तपत्रांनी ते ट्विट छापले. शबाना आझमींचा दावा कि, मी असे जातीय शब्द कधीच वापरले नाही हे सपशेल खोटं आहे ! भांडे फुटल्यावर आपली बाजू सावरायला शबाना आझमींनी सुरूवात केली. ९ एप्रिल २०१९ रोजी सकाळी ०६.०४ वाजता परत ट्विट केले. आणि म्हणाल्या, "मी नेहमी तिहेरी तलाक आणि बहुविवाह ह्यांच्याविरोधात बोलत असते. म्हणूनच हिंदू-मुस्लिम कट्टरतावादी मला नेहमीच लक्ष्य करतात". माझ्याकडे भरपुर वेळ असतो, ऑफिसमध्ये जास्त काम नसल्यावर मोबाईलवर नेट वापरतो ! थोडा विचार केला कि, शबानाजींच्या ट्विटचा आराखडा घेऊया ! भरपुर वेळ खर्च करून मला असे एकही ट्विट सापडले नाही ज्यामध्ये त्यांनी इस्लाम, कुराणवर उघडपणे टीका केली आहे ! जेवढ्या मोकळेपणाने त्या हिंदू धर्म व देवींवर टिका करतात, तेवढ्याच मोकळेपणाने अन्य पंथींयांबद्दल लिहील्याचे आढळले नाही ! असे काही ट्विट असेल तर ते स्वता शबानाजींनी दाखवण्याचे कष्ट घ्यावे ! काही ट्विट आहेत, पण त्यांची भाषा खुपच सौम्य असून शब्दांचा वापर खुप जपून केला होता. शबाना आझमी कधीही अन्य पंथीयांबद्दल (विशेषत: स्वताच्या) कधी बोलणार का ? अर्थातच ते शक्य नाही ! कारण मराठीतील एक लोकप्रिय नाटक आहे. ते म्हणजे "श्री तशी सौ". असाच हा प्रकार आहे. शबानाजींचे यजमान म्हणजे मौलाना जावेद अख्तर (निरीश्वरवादाचे ढोंग करणारे एक कट्टरपंथीय म्हणून मौलाना हा शब्दप्रयोग केला आहे.) हे अशाच पद्धतीचे सेक्यु(फेक्यु)लर आहे ! हे दांमपत्य नेहमीच ढोंग करण्यात पटाईत असतात. जावेद अख्तर ह्यांचे ट्विट म्हणजे नेहमीच उथळ बडबड केलेली असते ! अख्तरसाहेबांची एक गम्मत सांगतो ! मागच्यावर्षी टिपू सुलतानच्या जयंतीवर त्यांनी एक ट्विट केलं. त्यामध्ये लिहीले होते कि, बेंजामिन फ्रँक्लीन ह्याने अमेरिकेच्या स्वातंत्र्ययुद्धाची घोषणा केली. त्याला युद्धासाठी पैसा हवा होता म्हणून टिपू सुलतानकडे आर्थिक मदत मागितली. आणि टिपू सुलतानने मोठ्या मनाने मदत केली. अख्तरसाहेब टाईममशिनमध्ये बसतात आणि १८ व्या शतकात जाऊन बेंजामिन फ्रँक्लीनला विचारून येतात, ह्यावरून असाच तर्क निघू शकतो. डॉ. संजय दीक्षित ह्यांनी विचारले कि, हा इतिहास तुम्हाला शोलेची पटकथा लिहीताना सुचला का ? पुढे द स्किन डॉक्टर ह्यांनी पुरावे दिले. विकास सारस्वत नामक एका व्यक्तीने अख्तरसाहेबांना म्हटले कि, टिपू सुलतान चंद्रावरसुद्धा एका माणसाला पाठवणार होता. पण इंग्रजांच्या विरोधात लढण्याच्या नादात त्याने त्या माणसाला पाठवले नाही ! ह्या ट्विटनंतर अख्तरसाहेबांचे पित्त खळवले आणि त्यांनी सरळ निशाणा साधला तो संघ आणि सावरकरांवर ! त्यांनी ट्विटमध्ये म्हटले कि, "संघाचे नायक सावरकर ब्रिटीशांची माफी मागण्यात आणि त्यांचे सेवा करण्यात व्यस्त होते". विषय पुर्ण टिपू सुलतानवर चालला होता, पण बोलायला काहीच मुद्दा नव्हता. परत ट्विट करून म्हणाले, "माझे पणजोबा फजले-हक-खैराबादी हेसुद्धा १८५७ च्या युद्धात लढले होते. त्यांनाही काळ्यापाण्याची शिक्षा दिली होती, तिथेच त्यांचा मृत्यु झाला त्यांचे तिथे थडगं आहे". इथेच अख्तरसाहेब फसले आणि त्यांच्या पणजोबांचा खरा इतिहास समोर आला. १८५७ च्या युद्धात फजले-हक-खैराबादी ह्यांनी मुसलमानांना संघटित केले आणि त्यांना जिहाद करण्याचे आवाहन केले. युद्ध संपल्यावर इंग्रजांनी त्यांना अटक केली आणि न्यायालयात खटला सुरू झाला. तिथेच त्यांनी दयायाचना सुरू केली आणि म्हणाले, ज्या खैराबादीला आपण शोधत आहात; तो मी नाही. त्याचे आणि माझे नाव एकसारखे आहे. कृपया मला सोडून त्याला पकडा. पण त्यांचे काहीही न ऐकता ब्रिटीशांनी त्यांना काळ्या पाण्यावर धाडले. अंदमानातून खैराबादींनीसुद्ध सुटकेचे अर्ज पाठवण्यास सुरूवात केली होती. शेवटी त्यांनी तिथेच अखेरचा श्वास घेतला. खैराबादींनी सुटकेचा अर्ज केल्याने स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे योगदान कमी होत नाही. मात्र अख्तरसाहेब इथे सावरकरांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान सपशेल नाकारतात, सावरकरांनी स्वताबरोबर अन्य राजबंद्यांच्या सुटकेची नेहमीच मागणी केली होती. १९२१ च्या पत्रात त्यांनी १०० राजबंद्यांची सुटका केल्याबद्दल ब्रिटीशांचे आभार मानले होते. १८५७ च्या युद्धात खैराबादींनी मुस्लिमांना संघटित करायचे आवाहन केले होते, भारतीयांना नाही ! अख्तरसाहेबांनी स्वताच्या पणजोबांची आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांची तुलना करण्यापुर्वी अभ्यास करावा ! विकास सारस्वत ह्यांनी सगळा इतिहास समोर आल्यावर अख्तरसाहेब पसार झाले ! ह्या दामपत्यामध्ये ढोंगीपणा ठासून भरला आहे. ह्यांचे ट्विट वाचले तर कळते कि, त्यामथ्ये ज्ञानात भर पडावी असे काहीही मिळणार नाही. अख्तरसाहेबांच्या विचारांवर आक्षेप नाही, पण ते विचार उघडपणे न मांडण्यावर आक्षेप आहे. 

- मिहीर कुलकर्णी

चित्रदालन -



Comments

Popular posts from this blog

दोन वाचाळवीर -

दोन तोंडे नको त्यावेळी उचकटली गेली आहेत. एक आहेत मुस्लिमांचे पार्ट टाईम कैवारी मौलाना जावेद अख्तर, आणि दुसरे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे रामभक्त सीताराम येचुरी. हे दोघेही डाव्या विचारांचे असल्यामुळे तोंड उचकटणे हा त्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे. भाषणस्वातंत्र्याबरोबर अभिव्यक्तीस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य, व्यक्तीस्वातंत्र्य हे त्यांचे अधिकार आहेत. विशेष म्हणजे ह्या अधिकारांची डाव्यांनी कधीच कदर केली नाही, नेहमीच त्यांची मुस्कटदाबी आणि अवहेलना केली. आता हे आयते मिळाल्याने फुकटची मिरासदारी मिरवत आहेत ! श्रीलंकेतील बाँबस्फोटानंतर मुस्लिम महिलांच्या बुरख्यावर बंदी घालण्यात आली, केरळमध्येसुद्धा बंदी घालण्यात आली. (केरळमध्ये माकपचे सरकार आहे) ३ मे २०१९ रोजी बुरख्याप्रमाणे घुंघटावर बंदी घालावी अशी हास्यास्पद मागणी मौलाना अख्तरांनी केली. सामनात मुस्लिम महिलांच्या बुरख्यावर मागणी घालावी, असा लेख आल्याने खळबळ माजली. त्यापुर्वी श्रीलंकेत अध्यादेश काढून सार्वजनिक ठिकाणी बुरखाबंदी केली, फ्रान्समध्येसुद्धा बुरखाबंदी आहे ! मुस्लिम महिलांनी बुरखा घालणे किंवा न घालणे हा त्यांचा प्रश्न आहे. अख्तर ह...

गुरूजींचे विचारधन : सत्य आणि विपर्यास - भाग ३

आक्षेप क्र. ३ - तिरंगा व राज्यघटनेला विरोध. प्रवाहपतितांची घसरगुंडी - उदाहरणार्थ आपल्या नेत्यांनी आपल्या देशासाठी एक ध्वज तयार केला. त्यांची प्रवाहपतित अवस्था, परानुकर...

परत गांधी आमचे सावरकर तुमचे -

नुकतीच एक बातमी वाचनात आली. ती म्हणजे, राजस्थानमधील अशोक गेहलोत सरकारने १० वी च्या शैक्षणिक अभ्यासक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी एक बदल केला आहे. राजस्थानमध्ये ज्या विचाराचं सरकार येतं, तसे बदल पाठ्यपुस्तकातील इतिहासात होतात. भाजपच्या काळात विस्तारात आणलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या इतिहासाला गेहलोत सरकारने कात्री लावली आहे. जेलमध्ये होणा-या त्रासाला कंटाळून वीर सावरकरांनी ब्रिटीशांकडे चारवेळा दयेची याचिका केली आणि सरकारच्या अनुसार काम करण्याची आणि स्वताला पोर्तुगालचा मुलगा असल्याचं सांगितल्याचा उल्लेख केला. ब्रिटीशांनी सावरकरांची याचिका स्वीकारून १९२१ साली त्यांना जेलमधून मुक्त केले. तिथून सुटल्यावर हिंदूमहासभेत प्रवेश करून देशाला हिंदूराष्ट्र बनविणयाची संकल्पना मांडली. दुस-या महायुद्धाच्या काळात ब्रिटीश सरकारला मदत केली. १९४२ च्या "भारत छोडो" या आंदोलनाला सावरकरांनी विरोध केला होता. तसेच महात्मा गांधींच्या हत्येमधील मुख्य आरोपी नथुराम गोडसेला मदत केल्याच्या आरोपाचाही खटला सुरू होता. त्यातून सावरकरांची मुक्तता झाली, अशा आशयाचा इतिहास शिकवला जाणार आहे. सावरकरांच्...