Skip to main content

६०० जणांचा व्यापक कट तथा महाकारस्थान -

६ एप्रिल २०१७ रोजी बॉलिवूडच्या ६०० कलाकारांनी एक जाहिरनामा उर्फ फतवा काढला. त्यामध्ये असे लिहीले होते कि, "मतदान करा आणि भाजप व त्यांच्या मित्रपक्षांना सत्तेतून हाकलून लावा". ह्याचे नेतृत्व प्रामुख्याने ज्येष्ठ अभिनेते नासिरूद्दीन शाह, अमोल पालेकर, गिरीश कर्नाड, शांता गोखले, मकरंद देशपांडे, महेश एलकुंचवार, महेश दत्तानी, अरूंधती नाग, कीर्ती जैन, अभिषेक मुजूमदार, कोंकणा सेन-शर्मा, रत्ना पाठक-शाह, अनुराग कश्यप, एम.के.रैना, उषा गांगुली आदी कलाकार करत आहेत. १२ भाषांमध्ये हे पत्र तयार करण्यात आले असून आर्टिस्ट युनायटेड इंडिया या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आले आहे. "भारतीय संविधान धोक्यात आहे, भाजपला मतदान करू नका" असे ह्या पत्रात म्हटले आहे. सध्याची निवडणूक देशाच्या इतिहासातील अत्यंत महत्वाची निवडणूक आहे. आज भारताची सर्वसमावेशक संकल्पनाच धोक्यात आली आहे. आज आमचे नाणे, गाणे, विनोद हे धोक्यात आले आहे. "आज आमचे प्रिय संविधानदेखील ह्या तडख्यातून सुटलेले नाही". असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. खरतरं हा जाहिरनामा उर्फ फतवा काढला म्हणून आक्षेप घेण्याचे वा टिका करण्याचे काहीच कारण नाही. कारण आपल्या देशात लोकशाही आहे, ह्या जाहिरनाम्यावरून ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर विरूद्ध सोनी राजदान, स्वरा भास्कर, सुशांत सिंग रजपुत ह्यांच्यात चांगली जुंपली आहे. फक्त दोनच प्रश्न मला नमुद करायचे आहेत. पहिला प्रश्न म्हणजे, ह्या सहाशे जणांकडून अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मतदान ह्यावर धडे घ्यावेत अशी ह्यांची पात्रता आहे का ? दुसरा प्रश्न म्हणजे हे सहाशे जण योग्य उमेद्वार निवडू शकतात का ? दोन्ही प्रश्नांचे उत्तर आहे अजिबात नाही ! उद्योगपती मुकेश अंबानीच्या लग्नात ह्या कलावंतांनी वाडपी म्हणून काम केले आहे ! ह्यांच्याकडून स्वाभिमान शिकायचा का ? पालेकरांची एक गम्मत सांगतो. २०१४ च्या निवडणुकीवेळी त्यांनी डेक्कन पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केली कि, पुण्याच्या मतदार यादीत त्यांचे नाव नाही ! पोलिसांनी तपास केला तेंव्हा कळले कि, त्यांचे नाव मुंबईच्या मतदार यादीत आहे ! पालेकरांसारख्या बेजवाबदार मतदाराने लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य ह्यावर गप्पा मारणे म्हणजे, "लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वता मात्र कोरडे पाषाण". मुंबईत चित्रकार कै. प्रभाकर बर्वे ह्यांच्यावर व्याख्यान देण्यासाठी पालेकरांना निमंत्रण दिले होते. पण एखाद्या कार्यक्रमाला गेल्यावर दिलेल्या विषयाव्यतिरिक्त अन्य विषयावर बोलू नये, ह्या साध्या नियमाचा त्यांना विसर पडला ! ते व्यासपीठ म्हणजे सरकारविरोधी मळमळ व्यक्त करायची सुवर्णसंधी वाटली, अपेक्षेप्रमाणे आयोजकांनी त्यांचे भाषण मध्येच थांबवले ! अभिनेते योगेश सोमण ह्यांच्या भाषेत सांगायचे झाले तर, "बारश्याच्या कार्यक्रमाला मयताचे श्लोक" म्हटले. मग नंतर "अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी" असा टेंभा मिरवला. ६०० ची संख्या ८३५ वर पोहोचल्यावर भाजपाच्या बाजूने नामवंत कलाकारांसह ९०७ उभे राहिले. देश भ्रष्टाचारमुक्त करणारे, शेतक-यांचे कल्याण करणारे व विश्वात आपल्या देशाची प्रतिष्ठा वाढवणारे सरकार गेल्या पाच वर्षात आम्ही पाहिले आहे. त्यामुळे भाजपला मतदान करावे असे आवाहन पं.जसराज, गुलाम मुस्तफा खान, शंकर महादेवन, राम सुतार, अर्जुन डांगळे, वामन केंद्रे, पल्लवी जोशी आदींनी मतदारांना आव्हान केले आहे. नेशन फर्स्ट कलेक्टिव्ह या कलाकारांच्या स्वयंसेवी संस्थेतर्फे एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले असून त्यावर सिनेकलाकार, गायक, वादक, दिग्दर्शक, चित्रकार, वास्तुविशारद अशा देशभरातील ९०७ जणांची नावे आहेत. "कला आणि साहित्याशी जोडलेल्या आम्हा सर्वांतर्फे देशतील नागरिकांना आवाहन आहे. त्यांनी पुर्वग्रह न बाळगता येत्या लोकसभा निवडणुकीत मतदान करावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्या नेतृत्वातील सरकार सत्तेत राहणे काळाची गरज आहे. देशासमोर दहशतवादाचे सर्वात मोठे आव्हान असताना एक मजबूर नव्हे, मजबूत सरकार सत्तेवर राहणे गरजेचे आहे". असे मान्यवरांनी पत्रकात म्हटले आहे. कोयना मित्रा, पायल रोहतगी, योगेश सोमण, विवेक ऑबेरॉय, राहुल रॉय, हरिश भिमाणी, स्मिता आपटे ह्यांचाही ह्या ९०७ जणांमध्ये समावेश आहे. नागरिकांनी कोणत्याही दबावाविना, पुर्वग्रहविरहित मतदान करावे असे त्यांनी म्हटले आहे. शेवटी हे छक्केपंजे महारथींवरच उलटले. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी म्हणजे काय ? याची उदाहरणे खालीलप्रमाणे देतो. ह्या उदाहरणांचा त्या महारथींना विसर पडला असेल किंवा सोयीस्कररित्या दुर्लक्ष करत असतील...

१. पंडित नेहरूंच्या काळात गीतकार मजरूह सुलतानपुरी ह्यांनी नेहरूंच्याविरोधात काव्य लिहील्याने त्यांना तत्कालीन गृहमंत्री मोरारजी देसाईंनी तुरूंगात डांबले.

२. आणीबाणीवर टिका केल्यामुळे लोकप्रिय गायक किशोर कुमार ह्यांची गाणी आकाशवाणीवर वाजवण्यास बंदी घातली, सुदैवाने ते तुरूंगात गेले नाहीत.

. शब्दर हाश्मी ह्या कलावंताचा पथनाट्य सादर करताना खुन करण्यात आला.

४. संगीतकार हृदयनाथ मंगेशकर ह्यांनी स्वा.सावरकरांचे "ने मजसी ने" हे गीत चालबद्ध करून आकाशवाणीवर प्रसिद्ध केले. १७ दिवसात कारण न सांगता नोकरीवरून त्यांना काढून टाकण्यात आले.

५. गुलजार यांचा "आँधी" चित्रपट इंदिरा गांधींच्या आयुष्यावर आधारित आहे अशी आवई उठवण्यात आली, अनेक महिने चित्रपट प्रदर्शित झाला नाही. प्रत्यक्षात हा चित्रपट रोमँटिक आणि कौटुंबिक होता.

६. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकशाही मार्गाने निवडून आलेले पु.भा.भावे ह्यांचे भाषण निव्वळ ते हिंदुत्ववादी विचारांचे होते म्हणून उधळून लावले. 

६. "किस्सा कुर्सी का" हा आणीबाणीवर आधारित चित्रपट संजय गांधींच्या निशाण्यावर होता, त्याच्या नेगेटिव्ह्स संजय गांधींच्या आदेशानुसार जाळून टाकण्यात आल्या. पुढे शहा आयोगाने चौकशी केली व ते दोषी आढळले. नंतर त्यांना तुरूंगवारी करावी लागली.

७. २००४ साली भांडारकर संस्थेवरचा हल्ला आठवतोय का ? एक छटाकभरच्या पुस्तकात शिवरायांबद्दल मजकुर आला होता. ते पुस्तक बाजारांमधून मागे घेण्यात आले, मात्र तेवढाच मजकुर घेऊन त्याच्या प्रती घरोघरी पोहोचवल्या. आणि बाबासाहेब पुरंदरेंचे नाव पुरते बदनाम झाले. प्रा. हरी नरकेंनी ह्या राजकारणाचा पर्दाफाश केला, तर त्यांना धमक्या देण्यात आल्या ! 

८. बंगालमध्ये ममता बॅनर्जींचे कार्टुन काढल्याबद्दल एका चित्रकाराला तुरूंगवास भोगावा लागला. 

९. औरंगाबाद विमानतळावरून तस्लिमा नसरीननां हाकलुन लावण्यात आले. 

१०. दिल्लीच्या उर्दु फेस्टिवलमध्ये तारिक फतेहनां धक्का-बुक्की झाली, आणि जेएनयुमध्ये जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. 

११. कमल हसन दिग्दर्शित अफगाण दहशतवाद्यांवर असलेला "विश्वरूपम" ह्या चित्रपटावर तामिळनाडू सरकारने बंदी घातली. 

१२. रझा अकादमीने रेहमानच्याविरोधात काढलेला फतवा आठवतोय ना ? 

१३. २६ मार्च २०१९ रोजी हिमाचल प्रदेश विद्यापीठ परिसरातील संघशाखेवर एसआयएफ कार्यकर्त्यांनी हल्ला घडवून आणला, १५ स्वयंसेवक जखमी झाले.

१४. ९ एप्रिल २०१९ रोजी छत्तीसगडमधल्या दंतेवाड येथे आयडीस्फोट घडवून माओवाद्यांनी भाजप आमदार भीमा मांडवींची हत्या केली. 

१५. दुसरीकडे जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड येथील आरोग्य केंद्रात शिरून अतिरेक्यांनी रा. स्व. संघाचे नेते चंद्रकांत शर्मा ह्यांची हत्या केली. 

१६. १४ एप्रिल २०१९ रोजी ७५ वर्षीय गोंविदराजन ह्या मोदीसमर्थकाची द्रुमूक-काँग्रेस कार्यकर्त्यांकडून हत्या करण्यात आली. 

१७. १५ एप्रिल २०१९ रोजी ओडिसातील भाजप खुर्दा मंडलाचे अध्यक्ष मंगूली जेना ह्यांची ३ गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. 

१८. त्रिपुरातील डाव्या सरकारचा भ्रष्ट कारभार उघडकीस आणल्याने सुदीप भौमिक आणि शंतनु भौमिक ह्या दोन पत्रकारांची हत्या करण्यात आली. 

१९. १८ एप्रिल २०१९ रोजी प. बंगालमधील पुरूलिया जिल्ह्यातील बांगमुडी विधानसभा सदस्य आणि सिकंदराबाद ग्राम पंचायतीचे भाजप सदस्य यादव सहिस यांचा २२ वर्षीय पुत्र शिशुपाल सहिस ह्याचा मृतदेह झाडावर लटकलेला आढळला. ह्या घटनेमागे तृणमुल काँग्रेसचा हात असल्याचा संशय आहे. 

ही झाली अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीची उदाहरणे...सरकारविरोधी बोलणा-या, लिहीणा-यांना तुरूंगात डांबण्यात येत आहे आणि त्यांच्यावर देशद्रोहाचे खटले चालत आहेत ! अशी आवई उठवणा-यांनी शेवटच्या ७ घटनांवर प्रकाश टाकावा. केरळमध्ये मार्क्सवाद्यांची सत्ता आहे, राजरोसपण (स्वातंत्र्योत्तर काळापासून) संघकार्यकर्त्यांच्या देहाची खांडोळी केली जाते. मात्र जमात ऐ पुरोगामी, फेक्युलर्स ह्यांच्या तोंडातून "ब्र" निघत नाही. ह्या ५ वर्षात कोणत्याही साहित्य, संगीत, चित्रपटांवर बंदी घालण्यात आलेली नाही. जे चित्रपट वादग्रस्त ठरले त्यांनी गल्लाभर कमाई केली, पुरस्कार मिळवले, वृत्तपत्रांमध्ये फोटोसुद्धा छापून आले. अगदी लायकी नसलेल्या चित्रपटांना मीडियाने डोक्यावर घेतले. उरी : द सर्जिकल स्ट्राईक, मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झाँसी ह्या ब्लॉकबस्टर चित्रपटांना "विषारी राष्ट्रवाद" असे संबोधण्यात आले. त्याबद्दल कोणालाही ट्रोल करण्यात आले नाही. समाजमाध्यमांतून वरचेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली जाते, मोर्चे काढताना शिवीगाळ होते. संविधानिक पद्धतीने स्थापन झालेल्या सरकारला फॅसिस्ट, हुकूमशाह, उच्चवर्णीयांचे सरकार असे खुलेआम म्हटले जाते. लहान मुलांनासुद्धा शिवीगाळ करायला सांगितल जातं पण सरकार कोणालाही अटक करत नाही. शेहला राशिद म्हणते कि, मोदींच्या हत्येचा कट नितीन गडकरी आणि संघाने रचला आहे. नितीनजींनी कारवाईची भाषा करताच "हम तो मजाक कर रहे थे" असा पवित्रा घेतला. सत्तेवर आल्यावर निवडणुक आयोगाला तुरूंगात टाकू अशी भाषा प्रकाश आंबेडकर करतात. पुर्वीची उदाहरणे आणि ह्या ५ वर्षातील परिस्थितीचा आढावा घ्या आणि सांगा, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी म्हणजे काय ? एवढे छक्के पंजे खेळण्यापेक्षा स्वता एखाद्या राजकीय पक्षात प्रवेश करावा, तिकीट घेऊन निवडणुकीत उभं राहुन उघडपणे विरोध करावा ! बॉलिवूडचे अनेक कलाकार राजकारणात आहेत. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आणि ईशा कोप्पीकर ह्यांनी नुकताच काँग्रेस व भाजपमध्ये प्रवेश केला आहे. योग्य उमेद्वार मिळाला नाही तर हे Nota चे फॅड गळ्यात मारू शकतात. खरंतर आमच्या पिढीला आणीबाणी, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी ह्याबद्दल विशेष माहिती नाही. त्यामुळे त्यावर बोलून कोणालाही वेळ खर्च करायचा नाही. "पण आणीबाणी लागू झाली आहे" असा सुर जो ऐकू येतो त्यात आमच्या पिढीला तथ्य वाटू नये, आणि खरी आणीबाणी काय होती ? तसेच पुरोगाम्यांची स्वयंघोषित आणीबाणी म्हणजे काय, नव्या पेशवाईचा बागुलबुवा हे कळण्यासाठी हा लेखप्रपंच ! 

- मिहीर कुलकर्णी.

चित्रदालन -

Comments

Popular posts from this blog

दोन वाचाळवीर -

दोन तोंडे नको त्यावेळी उचकटली गेली आहेत. एक आहेत मुस्लिमांचे पार्ट टाईम कैवारी मौलाना जावेद अख्तर, आणि दुसरे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे रामभक्त सीताराम येचुरी. हे दोघेही डाव्या विचारांचे असल्यामुळे तोंड उचकटणे हा त्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे. भाषणस्वातंत्र्याबरोबर अभिव्यक्तीस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य, व्यक्तीस्वातंत्र्य हे त्यांचे अधिकार आहेत. विशेष म्हणजे ह्या अधिकारांची डाव्यांनी कधीच कदर केली नाही, नेहमीच त्यांची मुस्कटदाबी आणि अवहेलना केली. आता हे आयते मिळाल्याने फुकटची मिरासदारी मिरवत आहेत ! श्रीलंकेतील बाँबस्फोटानंतर मुस्लिम महिलांच्या बुरख्यावर बंदी घालण्यात आली, केरळमध्येसुद्धा बंदी घालण्यात आली. (केरळमध्ये माकपचे सरकार आहे) ३ मे २०१९ रोजी बुरख्याप्रमाणे घुंघटावर बंदी घालावी अशी हास्यास्पद मागणी मौलाना अख्तरांनी केली. सामनात मुस्लिम महिलांच्या बुरख्यावर मागणी घालावी, असा लेख आल्याने खळबळ माजली. त्यापुर्वी श्रीलंकेत अध्यादेश काढून सार्वजनिक ठिकाणी बुरखाबंदी केली, फ्रान्समध्येसुद्धा बुरखाबंदी आहे ! मुस्लिम महिलांनी बुरखा घालणे किंवा न घालणे हा त्यांचा प्रश्न आहे. अख्तर ह...

गुरूजींचे विचारधन : सत्य आणि विपर्यास - भाग ३

आक्षेप क्र. ३ - तिरंगा व राज्यघटनेला विरोध. प्रवाहपतितांची घसरगुंडी - उदाहरणार्थ आपल्या नेत्यांनी आपल्या देशासाठी एक ध्वज तयार केला. त्यांची प्रवाहपतित अवस्था, परानुकर...

परत गांधी आमचे सावरकर तुमचे -

नुकतीच एक बातमी वाचनात आली. ती म्हणजे, राजस्थानमधील अशोक गेहलोत सरकारने १० वी च्या शैक्षणिक अभ्यासक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी एक बदल केला आहे. राजस्थानमध्ये ज्या विचाराचं सरकार येतं, तसे बदल पाठ्यपुस्तकातील इतिहासात होतात. भाजपच्या काळात विस्तारात आणलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या इतिहासाला गेहलोत सरकारने कात्री लावली आहे. जेलमध्ये होणा-या त्रासाला कंटाळून वीर सावरकरांनी ब्रिटीशांकडे चारवेळा दयेची याचिका केली आणि सरकारच्या अनुसार काम करण्याची आणि स्वताला पोर्तुगालचा मुलगा असल्याचं सांगितल्याचा उल्लेख केला. ब्रिटीशांनी सावरकरांची याचिका स्वीकारून १९२१ साली त्यांना जेलमधून मुक्त केले. तिथून सुटल्यावर हिंदूमहासभेत प्रवेश करून देशाला हिंदूराष्ट्र बनविणयाची संकल्पना मांडली. दुस-या महायुद्धाच्या काळात ब्रिटीश सरकारला मदत केली. १९४२ च्या "भारत छोडो" या आंदोलनाला सावरकरांनी विरोध केला होता. तसेच महात्मा गांधींच्या हत्येमधील मुख्य आरोपी नथुराम गोडसेला मदत केल्याच्या आरोपाचाही खटला सुरू होता. त्यातून सावरकरांची मुक्तता झाली, अशा आशयाचा इतिहास शिकवला जाणार आहे. सावरकरांच्...