















वरील चित्रांमध्ये आपण पाहु शकता कि, किती खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे. संघ कसा चालतो, संघ कार्यकर्ते कसे उभे राहतात, कार्यकर्ता उभी करायची पद्धत कशी असते, संघाची विचाराधारा काय आहे, संघाची शिस्त कशाप्रकारची आहे, संघ आणि सहयोगी संघटना यांचे संबंध निर्धारित करणारे निकष कोणते असतात, ह्या प्रश्नांची माहिती व जूजबी नसताना माहिती व ज्ञानाच्या अभावी अनेक पत्रपंडित संघाविषयी वाट्टेल तसे तारे तोडतात. रा. स्व. संघाचा "भविष्य का भारत - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ का दृष्टिकोन" (१७ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर २०१८) संघकार्याची ओळख करून देणारा हा कार्यक्रम होता. देश-विदेशतील लोकांना निमंत्रण देण्यात आले होते. भारतातील संघविरोधक, संघद्वेष्ट्यांनाही निमंत्रण दिले होते. एकजण फिरकला नाही, कारण त्यांच्याकडे बोलण्यासारखे नवीन मुद्दे नाहीत. तेच-तेच खोडलेले आरोप करत राहतात. ह्या कार्यक्रमात सरसंघचालकांनी प्रत्येक आरोपांचे खंडन केले होते. संघ "विचारधन"पुर्वीसुद्धा चालत होता. संघ ही शब्दप्रामाण्यवादी वा ग्रंथप्रामाण्यवादी संघटना नसून काळाप्रमाणे वाढत जाणारी संघटना आहे. आयुष्यभर तेच तेच उगाळत बसलेले आरोप प्रगल्भतेच्या उंचीवर न जाता आयुष्यभर जोपासलेला आकस जो पुर्वग्रह व अज्ञानावर आधारित आहे. पुरोगाम्यांना जर कृती हवी असेल तर सेवाभारती, वनवासी कल्याण आश्रमची कामे बघून यावी. अनेक बोलघेवड्या पुरोगाम्यांपेक्षा जीवनविकास संघसंस्थांनी अधिक केला आहे. "विचारधन"ला संघ नव्हे तर विरोधक कवटाळून बसले आहेत. कोणीतरी वाद घालतो म्हणून त्याच्याशी वाद घालत बसण्यात काही अर्थ नसतो. विचारणारा जर उत्सुक, बुद्धीवादी किंवा तुमच्या बोलण्याचा त्याच्यावर परिणाम होणार असेल तर अर्थ आहे. निराधार आरोप आणि अनाठायी सल्ले देणा-यांशी वाद घातला, तर आपला वेळ वाया जाणार. गीतेमध्ये सांगितले आहे कि, "कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करू नये". तुम्ही स्पष्टीकरण देता म्हणजे फळाची अपेक्षा करता ! हृदयपरिवर्तन, मतपरिवर्तन हे प्रकार १९४८ नंतर महात्मा गांधींसोबत निघून गेले आहेत, आज निव्वळ बुद्धी मारण्याचे काम चालू आहे. आपल्याजवळ करण्यासारख्या भरपुर गोष्टी आहेत. समाजाला आणि देशाला आपल्याकडून भरपुर अपेक्षा आहेत त्यावर लक्ष देऊया. समाजातील प्रत्येक घटकांना आपल्यासोबत घेऊन काम करायचे आहे. "परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रम" हे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन कार्य करूया. तथाकथित बुद्धीवाद्यांच्या नादी लागून स्वताला त्रास करून घेऊ नका.
Comments
Post a Comment