गेल्या काही महिन्यांपासून मी प.पु.गोळवलकर गुरूजी लिखित "विचारधन"वर कार्य करत होतो. आज माझे कार्य पुर्ण झाले. गुरूजींनी आपले अतिप्राचीन सांस्कृतिक राष्ट्रस्वरूप विरोधाची तमा न बाळगता निर्भीडपणे आणि छातीठोकपणे सांगितले. त्यांच्या विचारांचे नानाप्रकारे विकृतीकरण करून राजकीय भांडवल पैदा करण्याचा प्रयत्न केला. पण टीकेमुळे गुरूजी कधीही क्षुब्ध झाले नाही किंवा आपली पातळी सोडली नाही. हिंदू जीवनविचार आणि त्या विचारांचे मुर्त प्रतीक असलेल्या हिंदूराष्ट्राच्या पुनरूत्थानाचे उद्दिष्ट ह्यापासून ते कधीही ढळले नाही. गुरूजी एक ऋषितुल्य व्यक्तीमत्व होते, आधुनिक काळातील संत म्हटले तरी वावगे ठरणार नाही. समग्र श्रीगुरूजी खंड १२ (श्रद्धासुमन : ह्यात गुरूजींना श्रद्धांजली देणा-यांची वाक्ये आहेत) हे पुस्तक वाचले तरी गुरूजी किती उदात्त व थोर व्यक्तीमत्व होते, याचा अंदाज येतो.
गुरूजींचा जीवनपरिचय खालीलप्रमाणे :
हजारों युवकांच्या मनात वास करणारे व्यक्तीमत्व.
स्वताच्या हाताने ३५ हजार पत्रे लिहीली, एकही खाडाखोड नाही.
आबालांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाला नावाने ओळखणारे.
ओजस व्यक्तीमत्व, अमोघ वाणी, कसदार नेतृत्व.
३३ वर्षांच्या काळात कामाचे डोंगर उभे केले.
कोणत्याही आपत्तीच्यावेळी स्वता संस्था उभारून काम करवून घेतले.
अ.भा.वि.प., विश्व हिंदू परिषद, वनवासी कल्याण आश्रम, भारतीय मजदूर संघ, विवेकानंद शिला स्मारक,
शिशुमंदिरे ह्या सर्वांमागे प्रेरणा गुरूजींची होती.
शिशुमंदिरे ह्या सर्वांमागे प्रेरणा गुरूजींची होती.
राजकारणात श्यामाप्रसाद मुखर्जींना पं.दीनदयाळ उपाध्यायांसारखे अनमोल रत्न दिले.
"मला वेळ नाही, मला जमणार नाही" असे वक्तव्य कधीच केले नाही.
श्रीकृष्ण आश्रमातील स्वामी श्री. भास्करेश्वरानंद यांना ज्ञानेश्वरीचे इंग्रजीत भाषांतर करून दिले.
त्यांचा अंधमित्र सावळाराम उत्तम बासरीवादक होता, त्यामुळे गुरूजींनाही बासरीवादनाचा छंद जडला.
ते आपल्या मित्रासाठी मोठमोठे ग्रंथ वाचायचे, आणि मित्राला वाचून दाखवायचे.
जीवनात स्वार्थाचा सुर नसावा म्हणून यतीत जीवन जगले.
नागपुरमध्ये काही काळ वकिली केली, घरावर "वकिल" अशी पाटी झळकली.
काशीमधील बनारस हिंदू विद्यापीठात त्यांना शिक्षक म्हणून नोकरी लागली, विषय कितीही सोपा असला तरी
मनाशी नीट मांडणी-जूळणी करून, त्याची टिपणे काढून शिकवत. विविध विषयांची माहिती असल्याने त्यांचे शिकवणे जेवढे उद्बोधक तेवढेच मनोरंजक वाटे, अनेक विद्यार्थ्यांना ते आपल्या मोठा भावाप्रमाणे वाटत होते.
मनाशी नीट मांडणी-जूळणी करून, त्याची टिपणे काढून शिकवत. विविध विषयांची माहिती असल्याने त्यांचे शिकवणे जेवढे उद्बोधक तेवढेच मनोरंजक वाटे, अनेक विद्यार्थ्यांना ते आपल्या मोठा भावाप्रमाणे वाटत होते.
याच काळात त्यांनी संस्कृत महाकाव्ये, उपनिषदे,
विवेकानंदांची व्याख्याने आणि पाश्चिमात्य तत्वज्ञान यांचा विशेष अभ्यास केला होता. लवकरच त्यांनी विद्वान शिक्षक असा लौकिक मिळवला. पण त्यापेक्षाही आपल्या परोपकारी वृत्तीमुळे अनेकांची अंत:करणे जिंकून घेतली.
विवेकानंदांची व्याख्याने आणि पाश्चिमात्य तत्वज्ञान यांचा विशेष अभ्यास केला होता. लवकरच त्यांनी विद्वान शिक्षक असा लौकिक मिळवला. पण त्यापेक्षाही आपल्या परोपकारी वृत्तीमुळे अनेकांची अंत:करणे जिंकून घेतली.
अनेक विद्यार्थ्यांना फी व पुस्तकासाठी पैसे देत होते, अनेकांना डॉक्टरांकडे स्वताच्या खर्चाने नेत व औषधपाणी करीत.
वर्षातून २ वेळा भारतभ्रमण आणि संघकार्यासाठी अखंड व अविरत प्रवास.
देशभरातील शाखांवर प्रवास आणि त्यादरम्यान शाखा संचलनातील बारकाव्यांवर लक्ष, प्रत्येक कार्यकर्त्याशी आत्मीयतेचे संबंध व घरोघरी सजीव संपर्क उदा - कोल्हापुर प्रवासामध्ये चिमण अष्टेकर.
समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात हिंदुत्वाच्या चिंतनावर अनेक संघटना निर्माण करण्यात महत्वाची भूमिका.
अनेक प्रसंगात देशहितासाठी वेळोवेळी स्पष्ट व परखड भूमिका.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय गतिविधींचा अभ्यास करून भविष्यात होणा-या परिस्थितीमधील परिवर्तन व घडामोडी यांचा अचूूक अंदाज. उदा - चीन व पाकिस्तानचे आक्रमण.
१९६६ साली प्रयाग येथे विश्व हिंदू परिषदेच्या संमेलनात सर्व संतांच्या एकमताने "न हिंदू पतितो भवेत" ही घोषणा केली.
गुरूजी विविध गुणांनी संपन्न, अलौकिक व्यक्तीमत्व लाभलेले द्रष्टे महापुरूष होते. आपले संपुर्ण जीवन संघकार्यात विलीन केले. संघाहुन वेगळा आपल्या जीवनाचा भाग प्रकट होऊ नये म्हणून प्रयत्न केला.
कर्करोगाने शरीर पोखरले तेंव्हा ते म्हणाले, "देह विनाशी आहे, पण राष्ट्रकार्य अमर आहे".
५ जून १९७३ साली गुरूजींनी जगाचा निरोप घेतला.
Comments
Post a Comment