Skip to main content

गुरूजींचे विचारधन : सत्य आणि विपर्यास - भाग ४

आक्षेप क्र. ४ - संभाजी महाराजांची बदनामी...

भक्तीचे सामर्थ्य - भक्ती म्हणजे सौदेबाजी नव्हे. भक्ती म्हणजे संपुर्ण आत्मसमर्पण. भक्तीचा सारा व्यवहार एकतर्फी असतो. आपण फक्त द्यावयाचे. अशा आत्मसमर्पण वृत्तीने भारलेले लोकच राष्ट्राला विनाशाच्या खोल गर्गेतून वर काढून वैभवाच्या शिखरावर नेऊन बसवितात. खंडो बल्लाळचे स्फूर्तिप्रद चरित्र आपल्यासमोर आहे. सिंहासनारूढ होताच संभाजी महाराजांनी काही पुर्वग्रहांमुळे खंडोजीच्या वडिलांना हत्तीच्या पायी दिले. खंडोजीचे वडिल शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळापैकी एक होते.
खंडो बल्लाळ त्यावेळी स्वाभिमानी, तडफदार, शुर तरूण होता. परंतु इतके असूनही संभाजी महाराजांनी
केलेला अपमान त्यांनी शांतपणे गिळून टाकला. पुढे मदिरा आणि मदिराक्षीच्या आधीन झालेल्या संभाजीची पापी नजर खंडोजींच्या बहिणीकडे वळली. खंडो बल्लाळांनी बहिणीच्या शीलाचे रक्षण करण्यासाठी आत्महत्या करण्यास अनुमती दिली ; परंतु संभाजीविषयीची राजनिष्ठा सोडली नाही. कारण संभाजीच्या अंगी व्यक्तिश: कितीही दुर्गुण असले, तरी उगवत्या हिंदू स्वराज्याच्या एकतेचे ते प्रतीक होते, आणि त्या प्रतीकाभोवती समस्त हिंदू शक्ती एकवटण्याचा प्रयत्न करीत होती याची खंडो बल्लाळला जाणीव होती.

मुल्यमापन - Wensenday 2 March 2016
विचारधन ह्या पुस्तकातील "छत्रपती संभाजी महाराज
यांच्या आक्षेपापर्ह मजकूराबद्दल...
श्री गोळवलकर गुरूजी (आरएसएस द्वितीय सरसंघचालक) यांच्या विचारधन ह्या पुस्तकातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या आक्षेपार्ह मजकूराबद्दल...

त्याबद्दल सत्य तथ्य आणि मिथ्य...

कालपरवा गुरूजींच्या विचारधन पुस्तकातील काही (मुद्दाम निवडक) सोशल मीडियावर प्रसारित करत संघ किती शिवशंभूद्रोही आहे असा दाखवण्याचा प्रयत्न केला गेला...निव्वळ भावनिक विषयाला हात घालून ब्राह्मण मराठा वाद आणखी किती चिघळवता येईल याची पुरेपुर काळजी या मंडळींनी घेतली...

त्यात ते आरएसएसचे हिंदुत्ववादी आणि जातीने ब्राह्मण मग काय...पुरोगामी, ब्रिगेडी इतिहासाची माहिती नसणारे आणि इतिहासाची माहिती करून घ्यावी अससुद्धा न वाटणारे लगेच हात धूवुन मागे लागले...!! काय करणार काहींचा तो आवडीचा आणि पोटतिडकीचा धंदा आहे. असो ! त्यातील पडताळा पाहू...प्रथम पुस्तकाची पहिली आवृत्ती आली ती १३  ऑगस्ट १९७१ साली...
प्रकाशक : हरी ना. दात्ये
३०९ शनिवार पेठ, पुणे.
मराठी संस्करण, हिंदुस्थान साहित्य...

छत्रपती संभाजी महाराजांवर प्रथम बखर लिहीली ती "मल्हार रामराव चिटणीस" या बखरकाराने (शंभुराजांच्या मृत्युच्या तब्बल १२२ वर्षांनी) महाराजांच्या बदनामीची सुरूवात यानेच केली. हा मल्हारराव बाळाजी आवाजी यांचा पणतू होता. बाळाजी आवाजी आणि आणखी तिघांना संभाजी महाराजांनी स्वराज्याशी गद्दारी केली म्हणून हात्तीच्या पायाखाली दिले हा इतिहास सर्वश्रुत आहे. १९६० पर्यंत हेच साधन उपलब्ध होते संभाजी महाराजांचे व्यक्तीमत्व वाचण्यासाठी...श्री गोळवलकर गुरूजींनी विचारधनमधील लिखाण १९४९ च्या दरम्यान एक व्यक्तीमत्व आणि चरित्रच्यावरून संभाजी महाराजांवर लिखाण केले. (एक पत्रक काढलं होते तत्कालीन वर्तमानपत्रात) विचारधनच्या लेखकाने नंतर ते पत्रक जसच्या तसं विचारधन या पुस्तकात वापरले.
महाराजांचा खरा इतिहास शोधून काढला तो इतिहासचार्य वा.सी. बेंद्रे यांनी...शंभुराजांचा खरा इतिहास शोधण्याचे काम केले वा.सी.बेंद्रे(ब्राह्मण)
यांनी केले. १९१८ ते १९५८ अशी ४० वर्षे त्यांनी देशात, परदेशात विविध साधनांचा, मोडीदस्तएवज, पत्र्यवहार अभ्यासून त्यांनी १९६० च्या सुमारास पहिला खरा इतिहास आणि शंभुचरित्र समोर आणले. शंभूराजांची वढू-बद्रुक येथील समाधी त्यांनीच शोधून काढली आणि १९३३ सालपर्यंत इब्राहिमखान याचा फोटो हा छत्रपती शिवराय यांचा फोटो समजून लोक पुजत होते. पण प्रथम वा.सी. बेंद्रे यांनी प्रथम छत्रपती शिवरायांचा फोटो शोधला आणि प्रसारितही केला.
पुढे याच वा.सी. बेंद्रेंच्या शंभुचरित्रावरून आणि इथे ओशाळला मृत्यु, जेंव्हा रायगडाला जाग येते प्रा.कानेटकरांची नाटके रंगमंचावर आली आणि शंभुराजांच खरं रूप समाजासमोर आलेे. श्री. शिवाजी सावंत यांची छवा कादंबरी समोर आली, त्यानंतर डॉ. कमला गोखले यांचा शिवपुत्र संभाजी हा ग्रंथ आला आणि वा.सी.बेंद्रेंच्या शंभुचरित्रावरून पीएच.डी. केली.
यावरून असे समजते कि, गोळवलकर गुरूजींनी मल्हारराव चिटणीसच्या बखरीवरून लिखाण केले आहे तेच साधन त्यावेळी त्यांना उपलब्ध झाले म्हणून ही चूक झाली. जात बघून लिहीलेला इतिहास समोर आणू नका. सत्यता पडताळा, महाभागांनो त्यांनी जे लिहीलं त्याची जाहिरात करता ! म्हणजे तुम्ही त्या "मल्हार रामराव चिटणीस"च्या वंशातील अाहात. असंच तुम्ही जेम्स लेनच इंग्लिशमधील लिखाण मराठीत घरोघरी पोहोचवले. जरा लाज वाटू द्या ! तरूण शिवशंभुभक्तांची दिशाभूल करू नका. शिवभक्तांनो नेहमी तुम्ही सत्य-असत्य हे जाणून पोस्ट पुढे पाठवा ही नम्र विनंती...
अर्ध्याहळकुंडाने पिवळे होण्याची सवय (बी-ग्रेडी) आणि फटीक ढोंगी शिवप्रेमी ब्राह्मणद्वेषी राजकारण करून भावनिक मुद्द्याला हात घालून हिंदुत्वाला अडचणीत आणायचा प्रयत्न तर चुकून करू नका.
उगाच जातीचा आधार घेऊन देव, देश, धर्म आणि महापुरूषांशी विद्रोह करू नका. निव्वळ विरोधाला विरोध म्हणून वांगी भाजू नका, सत्य जाणून घेण्याची तळमळ ठेवा आणि सत्य आहे ते मान्य करा. पुर्वग्रहदुषित असलेल्यांनी तर उगाच बैल गेला आणि झोपी केला असं करून आपल्या डोक्याचा बाजार करू नका.
शब्दलेखन :
महेश (विकी) राऊत.
श्री. आनंदराव जाधव
संदर्भ - झाडझडती ब्लॉगवरून...

Comments

Popular posts from this blog

दोन वाचाळवीर -

दोन तोंडे नको त्यावेळी उचकटली गेली आहेत. एक आहेत मुस्लिमांचे पार्ट टाईम कैवारी मौलाना जावेद अख्तर, आणि दुसरे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे रामभक्त सीताराम येचुरी. हे दोघेही डाव्या विचारांचे असल्यामुळे तोंड उचकटणे हा त्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे. भाषणस्वातंत्र्याबरोबर अभिव्यक्तीस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य, व्यक्तीस्वातंत्र्य हे त्यांचे अधिकार आहेत. विशेष म्हणजे ह्या अधिकारांची डाव्यांनी कधीच कदर केली नाही, नेहमीच त्यांची मुस्कटदाबी आणि अवहेलना केली. आता हे आयते मिळाल्याने फुकटची मिरासदारी मिरवत आहेत ! श्रीलंकेतील बाँबस्फोटानंतर मुस्लिम महिलांच्या बुरख्यावर बंदी घालण्यात आली, केरळमध्येसुद्धा बंदी घालण्यात आली. (केरळमध्ये माकपचे सरकार आहे) ३ मे २०१९ रोजी बुरख्याप्रमाणे घुंघटावर बंदी घालावी अशी हास्यास्पद मागणी मौलाना अख्तरांनी केली. सामनात मुस्लिम महिलांच्या बुरख्यावर मागणी घालावी, असा लेख आल्याने खळबळ माजली. त्यापुर्वी श्रीलंकेत अध्यादेश काढून सार्वजनिक ठिकाणी बुरखाबंदी केली, फ्रान्समध्येसुद्धा बुरखाबंदी आहे ! मुस्लिम महिलांनी बुरखा घालणे किंवा न घालणे हा त्यांचा प्रश्न आहे. अख्तर ह...

गुरूजींचे विचारधन : सत्य आणि विपर्यास - भाग ३

आक्षेप क्र. ३ - तिरंगा व राज्यघटनेला विरोध. प्रवाहपतितांची घसरगुंडी - उदाहरणार्थ आपल्या नेत्यांनी आपल्या देशासाठी एक ध्वज तयार केला. त्यांची प्रवाहपतित अवस्था, परानुकर...

परत गांधी आमचे सावरकर तुमचे -

नुकतीच एक बातमी वाचनात आली. ती म्हणजे, राजस्थानमधील अशोक गेहलोत सरकारने १० वी च्या शैक्षणिक अभ्यासक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी एक बदल केला आहे. राजस्थानमध्ये ज्या विचाराचं सरकार येतं, तसे बदल पाठ्यपुस्तकातील इतिहासात होतात. भाजपच्या काळात विस्तारात आणलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या इतिहासाला गेहलोत सरकारने कात्री लावली आहे. जेलमध्ये होणा-या त्रासाला कंटाळून वीर सावरकरांनी ब्रिटीशांकडे चारवेळा दयेची याचिका केली आणि सरकारच्या अनुसार काम करण्याची आणि स्वताला पोर्तुगालचा मुलगा असल्याचं सांगितल्याचा उल्लेख केला. ब्रिटीशांनी सावरकरांची याचिका स्वीकारून १९२१ साली त्यांना जेलमधून मुक्त केले. तिथून सुटल्यावर हिंदूमहासभेत प्रवेश करून देशाला हिंदूराष्ट्र बनविणयाची संकल्पना मांडली. दुस-या महायुद्धाच्या काळात ब्रिटीश सरकारला मदत केली. १९४२ च्या "भारत छोडो" या आंदोलनाला सावरकरांनी विरोध केला होता. तसेच महात्मा गांधींच्या हत्येमधील मुख्य आरोपी नथुराम गोडसेला मदत केल्याच्या आरोपाचाही खटला सुरू होता. त्यातून सावरकरांची मुक्तता झाली, अशा आशयाचा इतिहास शिकवला जाणार आहे. सावरकरांच्...