Skip to main content

गुरूजींचे विचारधन : सत्य आणि विपर्यास - भाग ३ (मुल्यमापन)

संघाला घटनाविरोधी, तिरंगाविरोधी ठरविणा-या तथाकथित विचारवंतांसाठी काही प्रश्न...

१. संघाला जर तिरंगा व घटनेबद्दल द्वेष असता तर संघ
लोकांपर्यंत पोहोचला असता का ?

२. २६ जानेवारी १९६३ रोजी प्रजासत्ताकदिनाच्या दिवशी पंडित नेहरूंनी संघाला पंथसंचलनात भाग घेण्याचे निमंत्रण का दिले ?
(त्यात ३००० स्वयंसेवकांनी भाग घेतला होता.)

३. १९७७ साली स्वामी विवेकानंद शिला स्मारकाचे अनावरण श्रीमती इंदिरा गांधींच्या हस्ते का झाले ?
(एकनाथजी रानडेंनी त्यांना निमंत्रण दिले होते.)

४. संघाने देशव्यापी संघटन कसे उभारले ?
(आवटेंच्या भाषेत सांगायचं झालं तर, जगातील महाकाय, शिस्तबद्ध, अभेद्य संघटना. अनेक सामाजिक उपक्रम, समाजोपयोगी कामे ह्या संघटनेकडून होतात.
थोडंफार कौतुक असूनही त्यांचे "असंगाशी संघ" हे विधान अनाकलनीय आहे.)

५. "संघ-भाजपाकडून आपण शिकले पाहिजे, लोकांपर्यंत आपण पोहोचले पाहिजे". असे राहुल गांधी का म्हणाले ? (ह्या बातम्या झी न्यूज, इंडिया टूडे, एबीपी माझाला दाखवल्या होत्या.)

६. माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जींनी संघाचे निमंत्रण का स्वीकारले ?

७. संघाच्या शाखांवर असे कोणते घटनाविरोधी कृत्य आढळले ?

८. मुक्तसंवादाच्या गप्पा मारता, मग संघाचे स्वयंसेवक आणि पदाधिकारी ह्यांच्याशी कितीवेळा अनौपचारिक चर्चा केली ?

९. जर ५२ वर्षे संघाच्या मुख्यालयावर तिरंगा फडकला नाही, तर एवढ्या वर्षात संघ मुख्यालयात जाणे आणि तिथल्या पदाधिकारी, सरकार्यवाह, सरसंघचालक ह्यांना
तिरंग्याचे महत्व समजावून सांगणे वा त्यांचे हृदयपरिवर्तन करणे आदी महान कार्ये काँग्रेस, कम्युनिस्टांकडून का नाही झाली ? (इंदौरचे उदाहरण आहेच.)

१०. कुराण संविधानापेक्षा मोठे आहे (सिद्दीकुल्लाह चौधरी), देशात आयसिसची विचारधारा लागू करणे म्हणजे देशविरोधी युद्ध पुकारणे नाही (केरळ न्यायालय), आदी मुद्द्यांवर चर्चा होते का ?

११. फक्त संघच नव्हे तर अन्य हिंदुत्ववादी संघटनादेखील हिंदुराष्ट्रवादाचा पुरस्कार करतात,
मात्र त्यांच्याकडूनही तिरंगा व राज्यघटनेचा सन्मान होतो ? प्लॅस्टिकच्या ध्वजावर बंदी घालण्यासाठी सनातन संस्थेने न्यायालयात धाव घेतली, तेंव्हा हे तथाकथित तिरंगाप्रेमी कुठे दडी मारून बसले होते ?

१२. शाखा में महिलाओं को देखा है शॉट्स में ? गांधींच्या आजूबाजूला नेहमी स्त्रिया होत्या, पण मोहन भागवत हे नेहमी एकटे किंवा पुरूषांनी घेरलेले असतात
(कोणाची तुलना कोणासोबत करावी एवढी समज नाही) ह्या विधानांवर डिबेट होते का ?

१३. संघाला भारतीय राष्ट्रवाद मान्य नाही, तर डाव्यांना आणि शरिया पुरस्कर्त्यांना भारतीय राष्ट्रवाद मान्य आहे का? (उलट हे लोक भारतीय राष्ट्रवादाचा पुरस्कार करणा-यांच्या गटात बसतात, पण हिंदुत्ववाद्यांचे विचार मात्र सेक्यु(फेक्यु)लर्सनां अस्पृश्य असतात.)

१४. २००० साली समाजवादी पक्षाचे नेते काझी साजिद मसुद ह्यांनी शहाबानो खटल्याचा निकाल शहाबुद्दीनच्याविरोधात गेला म्हणून तिरंगा पायदळी तुडविला, हा नतद्रष्ट माणूस राष्ट्रपती पदासाठी उमेद्वार म्हणून उभा होता ! त्यापूर्वी राष्ट्रीयगीताचा अपमान केला. सरकारकडून त्यांच्याविरोधात कोणतीही कारवायी झाली नाही. मात्र विरोधक आणि तथाकथित तिरंगाप्रेमी ह्यांनी एका शब्दानेही का निषेध केला नाही ?

१५. "संघाला घटना मान्य नाही, तिरंग्याला विरोध आहे"
हे सुर आयुष्यभर आळवले जातील. पण आपले स्वताचे लोक राष्ट्रीय प्रतिकांचा सन्मान करत नाहीत, त्यांचा सन्मान करायला शिकवण्यात आपण कमी पडलो ! ही वस्तुस्थिती सेक्यु(फेक्यु)लर्स मान्य करतील का ?

ह्या चर्चेतून आयोजकांना हेच दाखवायचे होते कि,
संघाचा तिरंगा व घटनेला विरोध आहे, आणि मान्य त्यांनी ते मान्यच करावे ! मात्र आपल्या समविचारी लोकांना पाठिशी घालायचे. ह्याला म्हणतात, "आपले ठेवायचे झाकून, दुस-याचे बघायचे वाकून". संघाला तिरंगा व राज्यघटना अमान्य आहे हा निव्वळ एकच आरोप किंवा वाद नाही. संघाच्या प्रत्येक गोष्टीवर वाद निर्माण करणे हा विरोधकांचा नेहमीचा उद्योग, तर काही लोकांच्या पोटापाण्याचा धंदा ! संघाबद्दल आणखी सुरू असलेले वाद पुढीलप्रमाणे -

१. गणवेश - कपडे नाही तर विचार बदला(एकाने वृतपत्रामध्ये असा लेख लिहीला होता), तर काहीजणांनी संघसंस्थापक आणि इंडोनेशियाच्या अध्यक्षांचे फोटो फेसबुुकवर टाकून टोपींची तुलना केली होती.

२. इफ्तार पार्टी - मुस्लिम राष्ट्रीय मंचाने इफ्तार पार्टी आयोजित केली होती. पण विरोधकच नव्हे तर हिंदुत्ववाद्यांमधून विविध प्रकारचे सुर उमटू लागले.
काँग्रेसचे सचिन सावंत म्हणाले कि, जर संघाला मुस्लिमांसोबत इफ्तार पार्टीची बुद्धी झाली असेल तर
मुस्लिमद्वेषाचे साहित्य जाळून टाका.

३. प्रणब मुखर्जी प्रमुख पाहुणे - २०१८ साली संघाच्या तृतीय शिक्षा वर्गाला माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी ह्यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रण दिले होते. मात्र प्रणबजींनी संघाच्या कार्यक्रमात जाऊ नये ह्यासाठी आटापिटा चालू होता, पण प्रणबजींनी भाषण दिल्यावर विरोधकांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या.

४. शस्त्रपूजन - "संघाजवळ एके-४७ आहे आणि संघाने जर नोंदणी केली नाही तर चक्का जाम करू, मोहन भागवतांनी मला मारण्याचा कट रचला आहे".
अशी मुक्ताफळे अॅड. प्रकाश आंबेडकरांनी उधळली होती. दस-याच्या महोत्सव जवळ आला कि, जमात ऐ पुरोगामींची पोटदुखी सुरू होते. हा त्यातलाच एका प्रकार ! चक्का जाम तर सोडा, ह्या साहेबांनी एक कोपरा नाही अडवला. गेली ९० वर्षे संघाचे पथसंचलन आणि शस्त्रपूजन चालते ते मागच्यावर्षी देशभरात सुरळीत पार पडले. सरसंघचालकांना अटक करायची मागणी करणारे महाभागही पाहण्यात आले. संघ फक्त भारतीय व्यायामसाधने आणि पारंपारिक शस्त्र बाळगतो (ज्याने जिवीतहानी होत नाही). गंमत म्हणजे
अणुबाँबच्या जमान्यात काठ्यांची भिती घातली जाते.

५. भगवा ध्वज -  "संघाचा भगवा दहशतवादाचे प्रतिक आहे, आमचा भगव्याला विरोध नाही. पण आम्ही शिवरायांचा आणि वारक-यांचा भगवा मानतो" दुटप्पीपणाला मर्यादा असते, जर भगव्याबद्दल आदर आहे तर "भगवा किंवा हिंदू आतकवांद" हे भूत का जन्माला घातले ? हा शब्दप्रयोग प्रथम माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम ह्यांनी केला. Quantico ह्या इंग्रजी मालिकेत (प्रियांका चोप्रा) हिंदूंना दहशतवादी दाखविण्याचा प्रयत्न झाला, स्वरा भास्कर म्हणते कि, सर्वत्र भगव्याचीच दहशत आहे. हिंदूत्वाला जागतिक पातळीवर बदनाम करायचे कारस्थान चालू आहे, दहशतवादाला रंग नसतो असे डायलॉग तरी का मारावेत ? भगवा आतंकवाद एक थोतांड आहे, एक दंतकथा आहे हे आता स्पष्ट होत चालले आहे. तरीही असे चित्र निमार्ण केले जाते कि, देशाला ह्याच रंगाचा सर्वाधिक धोका आहे !

६. सरसंघचालकांची जात - हा तर संघस्थापनेपासूनच वाद सुरू आहे. "संघ फक्त ब्राह्मणांचाच आहे, कारण सरसंघचालक पदासाठी कोणाही ब्राह्मणेत्तराची निवड
झाली नाही". (रज्जूभैय्या हे ब्राह्मणेत्तर सरसंघचालक होते) देशाचे पहिले पंतप्रधान कोण होते ? सरसंघचालक पदावर कोणीही असले तरी स्वयंसेवकांना फरक पडत नाही, कारण त्यांना सरसंघचालकांच्या जातीशी नव्हे तर नेतृत्वाशी देणे-घेणे असते. संघाची एक पद्धत आहे. ती म्हणजे, तुम्ही जसेजसे संघात सक्रिय व्हाल तसेतसे तुम्हाला विविध पदे मिळतील.

७. संघाची नोंदणी - रा. स्व. संघाची नोंदणी अद्यापही का नाही झाली ? विनोद म्हणजे, देशावर सर्वाधिक राज्य ज्यांनी केले आणि ३ वेळा संघावर बंदी घातली त्यांनी हा प्रश्न विचारला. मध्यप्रदेशात कमलनाथ सरकारने अद्यापही संघाच्या शाखांवर बंदी नाही का घातली ? (तसा जाहिरनामा काढला होता.)

८. संघाची कार्यपद्धती (एकचालकानुवर्तित्व - म्हणजे एकाच्या हाती सर्व सत्ता एकवटलेली असते) - हा शब्द विरोधकांना फार झोंबत असतो. संघात कोणत्याही प्रकारची निवडणुक होत नसते, सरसंघचालक आपला उत्तराधिकारी निवडतात. खरंतर ह्या पद्धतीवर आक्षेप घेण्यासारखे काहीच नाही. संघाचे लोक एकाच सांस्कृतिक विचारधारेचे असल्यामुळे तिथे कोणत्याही प्रकारची स्पर्धा चालत नाही. आजपर्यंत कोणत्याही सरसंघचालकांनी मनमानी, अरेरावीपद्धतीने कारभार केला नाही. एखादी व्यक्ती कितीही लोकप्रिय असली तरी ती संघटनेचा ताबा घेऊ शकत नाही, अशी रचना संघाची करण्यात आली आहे. सरसंघचालकांच्या मदतीसाठी "अखिल भारतीय प्रतिनिधी सभा" असते.

९. दिल्ली विज्ञान भवन कार्यक्रम - "भविष्य का भारत -
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ का दृष्टीकोण"(१७ ते १९ ऑगस्ट
२०१८) हा कार्यक्रम दिल्लीमध्ये आयोजित केला होता.
देश-विदेशातील लोकांना निमंत्रण दिले होते. भारतातील संघविरोधक, संघद्वेष्ट्यांनाही निंमत्रण दिले होते. पण एकजणही फिरकली नाही, टी.व्ही आणि पेपरमधून गरळ ओकणा-यांना संघाच्या कार्यक्रमात जाऊन बोलायचे म्हटल्यावर अवसान गळून जाते.
ह्या कार्यक्रमात सरसंघचालकांनी प्रत्येक आरोपाचे खंडन केले होते आणि श्रोत्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली होती.

टी.व्ही.पंडित आणि पत्रपंडित संघस्वयंसेवकांना तिरंगा व घटनेच्या मुद्द्यावरून आरोपीच्या पिंज-यात उभे करतात. त्यांच्या स्वताच्या गटातील लोकांकडून जेंव्हा राष्ट्रीय प्रतिकांचा अवमान होतो, तेंव्हा मात्र हे लोक दडी मारून बसतात. कारण त्यात संघ परिवारातील लोक नसतात. ह्या मंडळींना ऑर्डस द्यायची भयंकर आवड ! हे लोक संघाबद्दल कधीही समाधानी नसतात.
"जर संघाने हे केले नाही तर संघ वाढणार नाही, लोक संघावर विश्वास ठेवणार नाहीत". अशा सुचनाही दिल्या जातात. पण संघ जराही बिथरला नाही वा भरकटला नाही, कारण संघाचे ध्येय फार मोठे अाहे. चार भितींत बसून सल्ले  देणा-यांना संघ कधीही कळणार नाही.
वस्तुस्थिती अशी आहे कि, अनेकप्रकारे वाद उकरून संघाचे महत्व कमी करण्यात विरोधक सतत तोंडघशी पडत आहेत. ह्यांच्याजवळ नवीन असे काहीच नाही !
- मिहीर कुलकर्णी.

Comments

Popular posts from this blog

दोन वाचाळवीर -

दोन तोंडे नको त्यावेळी उचकटली गेली आहेत. एक आहेत मुस्लिमांचे पार्ट टाईम कैवारी मौलाना जावेद अख्तर, आणि दुसरे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे रामभक्त सीताराम येचुरी. हे दोघेही डाव्या विचारांचे असल्यामुळे तोंड उचकटणे हा त्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे. भाषणस्वातंत्र्याबरोबर अभिव्यक्तीस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य, व्यक्तीस्वातंत्र्य हे त्यांचे अधिकार आहेत. विशेष म्हणजे ह्या अधिकारांची डाव्यांनी कधीच कदर केली नाही, नेहमीच त्यांची मुस्कटदाबी आणि अवहेलना केली. आता हे आयते मिळाल्याने फुकटची मिरासदारी मिरवत आहेत ! श्रीलंकेतील बाँबस्फोटानंतर मुस्लिम महिलांच्या बुरख्यावर बंदी घालण्यात आली, केरळमध्येसुद्धा बंदी घालण्यात आली. (केरळमध्ये माकपचे सरकार आहे) ३ मे २०१९ रोजी बुरख्याप्रमाणे घुंघटावर बंदी घालावी अशी हास्यास्पद मागणी मौलाना अख्तरांनी केली. सामनात मुस्लिम महिलांच्या बुरख्यावर मागणी घालावी, असा लेख आल्याने खळबळ माजली. त्यापुर्वी श्रीलंकेत अध्यादेश काढून सार्वजनिक ठिकाणी बुरखाबंदी केली, फ्रान्समध्येसुद्धा बुरखाबंदी आहे ! मुस्लिम महिलांनी बुरखा घालणे किंवा न घालणे हा त्यांचा प्रश्न आहे. अख्तर ह...

गुरूजींचे विचारधन : सत्य आणि विपर्यास - भाग ३

आक्षेप क्र. ३ - तिरंगा व राज्यघटनेला विरोध. प्रवाहपतितांची घसरगुंडी - उदाहरणार्थ आपल्या नेत्यांनी आपल्या देशासाठी एक ध्वज तयार केला. त्यांची प्रवाहपतित अवस्था, परानुकर...

परत गांधी आमचे सावरकर तुमचे -

नुकतीच एक बातमी वाचनात आली. ती म्हणजे, राजस्थानमधील अशोक गेहलोत सरकारने १० वी च्या शैक्षणिक अभ्यासक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी एक बदल केला आहे. राजस्थानमध्ये ज्या विचाराचं सरकार येतं, तसे बदल पाठ्यपुस्तकातील इतिहासात होतात. भाजपच्या काळात विस्तारात आणलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या इतिहासाला गेहलोत सरकारने कात्री लावली आहे. जेलमध्ये होणा-या त्रासाला कंटाळून वीर सावरकरांनी ब्रिटीशांकडे चारवेळा दयेची याचिका केली आणि सरकारच्या अनुसार काम करण्याची आणि स्वताला पोर्तुगालचा मुलगा असल्याचं सांगितल्याचा उल्लेख केला. ब्रिटीशांनी सावरकरांची याचिका स्वीकारून १९२१ साली त्यांना जेलमधून मुक्त केले. तिथून सुटल्यावर हिंदूमहासभेत प्रवेश करून देशाला हिंदूराष्ट्र बनविणयाची संकल्पना मांडली. दुस-या महायुद्धाच्या काळात ब्रिटीश सरकारला मदत केली. १९४२ च्या "भारत छोडो" या आंदोलनाला सावरकरांनी विरोध केला होता. तसेच महात्मा गांधींच्या हत्येमधील मुख्य आरोपी नथुराम गोडसेला मदत केल्याच्या आरोपाचाही खटला सुरू होता. त्यातून सावरकरांची मुक्तता झाली, अशा आशयाचा इतिहास शिकवला जाणार आहे. सावरकरांच्...