आक्षेप क्र. ३ - (भाग २) तिरंगा व राज्यघटनेला विरोध
"राष्ट्रगीताची सक्ती आणि वंदेमातरम कि जन-गण-मन वाद" : RSS कार्यकर्त्यांच्या नजरेतून".
लेखक - महेश मोहन वैद्य.
विशेष सुचना - सदर लेखात व्यक्त केलेले विचार व्यक्तीगत आहेत. Inmarthi.com त्या विचारांशी सहमत असेलच असे नाही.
आधुनिक काळात जागतिक पटलावर कोणत्याही देशाची ओळख किंवा अस्मिता राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत ह्या दोन गोष्टींनी अधोरेखित होतात. राष्ट्रध्वज ह्यांना भारतात काय जागतिक इतिहासात काय लाखो-हजारो वर्षांची परंपरा आहे. अगदी छोट्या संस्थानांपासून ते मोठ्या साम्राज्यापर्यंत प्रत्येकाचा वेगळा ध्वज आणि त्याचा अभिमान दोन्ही सोबत चालले आहेत. पण राष्ट्रगीत ही १९ व्या शतकाची भेट आहे. तिचा एवढा प्रसार झाला कि, आज जगात अस्तित्वात असलेल्या प्रत्येक ज्ञात आणि अज्ञात प्रत्येक देशाचे राष्ट्रगीत त्या त्या देशाचे मानचिन्ह आहे. राष्ट्रगीताचा वाद नक्की काय आहे हे माहित नसताना, विविध लोकांच्या अनेक उलटसूलट प्रतिक्रिया बघायला मिळल्या. प्रथम भारताचे राष्ट्रगीत जन-गण-मन लिहील्यापासूनच वादाची किनार मागे लागली आहे. हे "जन-गण-मन" नोबेल पारितोषक विजेते कवी, चित्रकार, लेखक, शिक्षक असे उत्तुंग व्यक्तीमत्व स्व. रविंद्रनाथ टागोर ह्यांनी १९११ मध्ये लिहीले. त्यांनी ते इंग्लंडचा राजा पंचम जॉर्ज यांच्या भारत भेटीच्या वेळी त्यांच्या स्वागतासाठी त्यांचे कौतुक म्हणून लिहीले आहे असे काही लोक म्हणतात. तर काही लोक हा गैरसमज असल्याचे सिद्ध करण्यास प्रयत्न करतात. यात असलेल्या "भारत भाग्यविधाता" ह्या शब्दरचनेमुळे वाद आहे. तर काहीजणांना जन गण मनऐवजी बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी आनंदमठ कादंबरीतीत १८८२ साली लिहीलेल्या "वंदे मातरम" ह्या गीताला राष्ट्रगीत बनवावे अशी इच्छा होती. कारण १८८२ पासून भारतीय स्वातंत्र्य सैनिकांत हे गीत कमालीचे लोकप्रिय झालेच पण यातील वंदे मातरम आणि भारत माता की जय ह्या आंदोलनातील जयघोष झाला होता. अनेक क्रांतिकारक वंदे मातरम असे जयघोष करत फासावर लटकले किंवा इंग्रज सैनिकांच्या गोळ्यांना बळी
पडत अमर झाले, तर काँग्रेसची एकही सभा या दोन घोषणेशिवाय होत नव्हत्या. "वंदे मातरम" हे गीत १८९६ मध्ये रंविद्रनाथ टागोरांनी काँग्रेसच्या अधिवेशनात म्हटले. १९०५ मध्ये इंग्रजांनी ह्या गीतावर बंदी पण आणली. तरी १९१५ पासून हे गीत नियमित व आग्रहपूर्वक काँग्रेसच्या प्रत्येक कार्यक्रमात सर्व धर्माचे लोक एकदिलाने गाऊ लागले. या काळात हे गीत भारतीय जनतेचे राष्ट्रीयगीतच बनले होते. पण १९२१ काँग्रेसने खिलाफत चळवळीला पाठिंबा दिला आणि वंदे मातरमचे भाग्यच पालटले. या खिलाफत चळवळीमुळे भारतातील इस्लामी धार्मिक कट्टरतावाद
आणि त्याचे परिणाम एवढ्या विकोपाला गेले कि आतापर्यंत लोकप्रिय आणि सगळ्या धर्माचे ज्या घोषणा आणि गीत एकदिलाने म्हणायचे त्यांना मुर्तीपुजक गीत आणि घोषणा म्हणून विरोध होऊ लागला. याचे पर्यावसान म्हणून १९२३ साली काँग्रेस अधिवेशनात तत्कालीन अध्यक्ष मोहम्मद अली जिना
यांनी इस्लामविरोधी घोषित केले आणि याचे गायन बंद करायची मागणी केली. या मागणीपुढे काँग्रेस झुकली आणि काँग्रेसमधील "वंदे मातरम" गायन बंद पडले.
१९३७ साली काँग्रेसनेच वंदे मातरमच्या दोन कडव्यांना त्यात मुर्तीपूजा नसून देशाच्या सौदर्याचे वर्णन असे म्हणत राष्ट्रगीत म्हणून मान्यता दिली. १९४७ भारत स्वतंत्र झाल्यावर अनेक हिंदू संघटना, राजकीय पक्षांना आशा होती कि, "वंदे मातरम" भारताचे अधिकृत राष्ट्रगीत होईल पण तत्कालीन सरकारने "जन गण मन"ला राष्ट्रगीत बनवले आणि काही दिवस हा वाद पुन्हा ऐरणीवर आला. मात्र तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांच्या पुढाकाराने "वंदे मातरम"च्या पहिल्या दोन कडव्यांना राष्ट्रगीताचा दर्जा दिला गेला.
आता तुम्ही म्हणाल कि, वरील काहींना माहित असलेल्यांना आणि काहींना माहित नसलेल्या इतिहास पुन्हा सांगायची गरज काय ? पण विवादाची सुरूवात इतिहासापासूनच आहे. कट्टर धार्मिक मानसिकता कोणत्या स्वरूपात राजकारण करते, त्याचा फायदा घेणारे राजकारणी कसे घेतात आणि सामान्य लोकांचा बुद्धीभेद कसा करतात हे या सगळ्यात अभ्यासण्यासारखे आहे. या वाद-विवादानंतर जेंव्हा २४ जानेवारी १९५० साली जन गण मनला भारताचे राष्ट्रगीत म्हणून अधिकृतपणे केले, तेंव्हा सगळ्या भारतीयांनी ह्याला भरभरून प्रेम दिले जे कोणत्याही देशाच्या राष्ट्रगीताला मिळायला हवे. यात हिंदू महासभा,
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या हिंदू संघटना ज्यांना मनापासून वंदे मातरम हे राष्ट्रगीत म्हणून हवे होते यांनीही राष्ट्रगीताला तितकाच मनापासून सन्मान दिला.
पण २०१६ साली एक खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने देशातील सगळ्या चित्रपटगृहात चित्रपट प्रदर्शनाच्या
आधी राष्ट्रगीत वाजवावे असा निर्णय दिला आणि ह्या निर्णयामुळे एका नवीनच वादाला तोंड फुटले. या वादाचा मला नाही वाटत कि कोणत्याही सामान्य भारतप्रेमी नागरिकाने संविधान निर्मात्यांनीही इतका विचार केला असेल. पण अशी स्थिती २०१६ मध्ये उभी ठाकली. जेंव्हा या निर्णयाची पूर्तता म्हणून भारतातील सगळ्या चित्रपटगृहात राष्ट्रगीत वाजविण्यास सुरूवात झाली आणि देशातील बहुसंख्य लोक राष्ट्रगीताला सन्मान म्हणून उभे राहुन त्यास मानवंदना देऊ लागले.
तेंव्हा दोन मानसिकतेचे लोक जाणूनबुजून बसून राहुन राष्ट्रगीताचा अपमान करू लागले. त्यातील पहिले होते फाळणीनंतरही जायची इच्छा असून पाकिस्तानात न जाऊ शकलेेले मुस्लिम ज्यांनी पुन्हा तेच कारण समोर केले जे वंदे मातरम बाबत मोहम्मद अली जिन्ना ह्यांनी दिले होते कि, "हे गीत मुर्तीपूजक असून इस्लामच्या विरोधात आहे". याला कारण म्हणून राष्ट्रगीतातील अधिनायक शब्दाला आक्षेप नोंदवला. त्यातबरोबरच भारतात अजून एक परिस्थिती उद्भवली जी अराजक परिस्थिती निर्माण करण्यात तरबेज आहे. कायद्याने बोलताना मानवतावाद, स्वातंत्र्यवाद याला महत्व देऊन मनात अंतर्गत नक्षलवादाचा प्रभाव पाडून भारतातील सार्वभौमिक, संविधानिक, लोकशाहीव्यवस्था उखडून टाकायची मनसूबे बांधत होती, ती म्हणजे कम्युनिस्ट विचारसरणी. या भांडणाचे राजकारण त्यांच्या पद्धतीने
करताना जे करोडो भारतीय उभे राहुन राष्ट्राबद्दल सन्मान देत आहेत त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली बुद्धीभेद केला आणि इतकी वर्षे सत्तेवर असलेल्या काँग्रेस सरकारने ह्याकडे दुर्लक्ष केले.
"राष्ट्रगीताला सन्मान म्हणून उभे राहणे प्रत्येक भारतीयाचे नैतिक आणि संवैधानिक कर्तव्य आहे".
आणि ते कर्तव्य निभावण्यात भारतीय कधी कमी पडणार नाही याची खात्री असल्यानेच कदाचित संविधानाच्या संसदीय समितीने मार्गदर्शक नियम दिले तरी त्याला कायद्याचे आवरण दिले नाही. याचाच फायदा अराजक अभिव्यक्ताचे कैवारी आणि इस्लामी धर्माभिमानी देत आहेत. या मार्गदर्शक तत्वांमध्ये राष्ट्रगीत कुठे वाजवायचे आणि सुरू असताना कसे उभे राहायचे याचे स्पष्ट निर्देश ह्या नियमात दिले आहेत. त्यात बदल फक्त इतकाच केलाय कि कोणत्याही कलाकृतीत कथेच्या ओघात राष्ट्रगीताची धून दाखवण्यात किंवा ऐकवण्यात येत असेल तर सावधानमध्ये उभे राहायची गरज नाही. पण कट्टर धार्मिक इस्लामी आणि स्युडो अभिव्यक्तीवादी यांचे
२०१६ नंतर चित्रपटगृहात बहुसंख्य भारतीयांशी खटके उडायला लागले. मुंबईतील कुर्ला येथे चित्रपटगृहात एका मुस्लिम परिवाराला, तसेच केरळमध्ये डाव्या विचारसरणींच्या कार्यकर्त्यांना याच कारणावरून चित्रपटागृहातील इतर लोकांशी खटके उडाले, प्रत्येकावर त्या त्या ठिकाणी पोलिसांवर गुन्हा नोंदवण्यासाठी दबाव आणला गेला. यामुळे या सक्तीची चर्चा-प्रतिचर्चा, विरोध, मोरल पोलिसिंगचा आरोप याचा धुराळा उडाला आणि हे प्रकरण न्यायालयात गेले.
निदान वर्तमानपत्र, वृत्त वाहिन्यामधील बातमीने तरी हाच मुद्दा समोर आणला आहे. मित्रांनो ! मुळातच खरा मुद्दा हाच आहे ! राष्ट्रगीत कुठं वाजवायचं ?, का वाजवायचं ? किती वाजवायचं ? हा मुद्दाच नाही आहे.
"खरा मुद्दा आहे की, राष्ट्रगीत सुरू असताना आम्ही राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ उभे का राहायचे आणि आम्ही उभे नाही राहिलो तर तो गुन्हा होतो का ?"
मात्र तोच धागा पकडून माननीय न्यायालय अजून पुढे जाऊन असे म्हणते कि, राष्ट्रगीताच्यावेळी उभे राहणे सक्तीचे नाही. चित्रपटगृहात राष्ट्रगीत वाजवायचे कि नाही ? हा मुद्दा नाही आणि कधीच नव्हता. मुळात भारतातील काही लोक धार्मिकतेच्या किंवा वैचारिकतेच्या बांधीलकीच्या नावाखाली बहुसंख्य भारतीय लोक जे करतात ते आपण न करता आपली वेगळी ओळख ठसवण्याचे उद्योग आहेत. या लोकांना राष्ट्रगीत उभे राहणे हे राष्ट्रगीताप्रती आणि राष्ट्रप्रती असलेली बांधिलकी आणि कर्तव्य न वाटता सक्ती वाटते ते याच कारणासाठी. चित्रपटागृहात राष्ट्रगीत सुरू असताना उभे न राहिल्यास त्याबद्दल आक्षेप ज्यांच्यावर घेतला गेला त्यात दुर्दैवाने मुख्यत: वरील दोन प्रकारचे (धार्मिक किंवा वैचारिक) लोक होते. काही ठिकाणी मारझोड झाली जी व्हायला नको होती आणि काही ठिकाणी चुकीची भूमिका पण घेतली गेली. शारिरीक व्यंग असलेल्या लोकांवर उभे राहायची सक्ती केली गेली जे व्हायला नको होतं असं मला मनापासून वाटते. पण त्याचबरोबर धार्मिकतेच्या मुद्द्यावर राष्ट्रगीताच्या वेळेस उभे न राहणे पण तितकेच अयोग्य आहे. कारण हा फक्त भावनेचा आणि अस्मितेचा प्रश्न नसून राष्ट्रीय कर्तव्याच्या जाणीवेचा प्रश्न आहे.
बाकी वैचारिक बांधिलकी आणि लिबरल याच्या विचाराखाली उभे राहण्यास नकार देणारे डावे हे भारताच्या विचारधारेशी कधी एकरूप झालेचं नाहीत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर घटनाविरोध असल्याचा सतत आरोप आणि संघ शाखेत कधी राष्ट्रध्वज लावत
म्हणून संघाला दुषणे देणारे स्वता किती संविधानाचा आदर करतात याची जंत्री देणारे डावे, स्वता खुलेआम राष्ट्रगीताचा आदर करत नाहीत ही वस्तुस्थिती आहे.
या प्रकरणात राष्ट्रगीताकरता उभे न राहिल्यामुळे ज्यांच्यावर कारवाई झाली ते डाव्या विचारांचे लोक होते. त्यात संघाचा किंवा हिंदूत्ववादी पकडला गेला नाही यातच सगळ आलं. काहींना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा "जन-गण-मन"ला विरोध विरोध असताना ह्याबाबत घेतलेली भूमिका हास्यास्पद वाटते. पण मुळातच संघाने किंवा संघ परिवारातील सदस्याने राष्ट्रगीताचा जाणूनबुजून अपमान केल्याच अजून तरी
बघण्यात आलं नाही. आता तुम्हाला विचार करायचा आहे कि संवैधानिक आणि संपुर्ण लोकशाही पद्धतीने स्वीकारलेल्या राष्ट्रगीताला उभे राहणे सक्तीचे आहे का ? उभे न राहणारे देशद्रोही नाही का ? पुन्हा एकदा सांगतो की मुद्दा हा नाहीच कि राष्ट्रगीत कुठे वाजवायचे... मुद्दा हा आहे कि राष्ट्रगीताला मान द्यायचा का ?
खालील चित्रे बघा आणि सांगा कि, राष्ट्रीय प्रतिकांचा अपमान करणारे संघ परिवारातील किती लोक आहेत !
चित्रदालन -
Comments
Post a Comment