Skip to main content

गुरूजींचे विचारधन : सत्य आणि विपर्यास - भाग ३

आक्षेप क्र. ३ - तिरंगा व राज्यघटनेला विरोध.

प्रवाहपतितांची घसरगुंडी -

उदाहरणार्थ आपल्या नेत्यांनी आपल्या देशासाठी एक ध्वज तयार केला. त्यांची प्रवाहपतित अवस्था, परानुकरणवृत्ती याचेच हे निदर्शक आहे. हा ध्वज कसा तयार झाला ? फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळी फ्रेंचांनी समता, बंधुत्व, स्वातंत्र्य या तीन कल्पनांचे तीन पट्टे घेऊन हा ध्वज तयार केला. नंतर असे स्पष्टीकरण करण्यात येऊ लागले की हा ध्वज येथील निरनिराळ्या जातीजमातींचे एकतेचे प्रतिक आहे. भगवा रंग हिंदूंचे प्रतिक, हिरवा रंग मुसलमानांचे, पांढरा बाकी राहिलेल्या सर्व जातींचे. अहिंदूं जमातींपैकी मुसलमानांचा खास उल्लेख करण्याचे कारण असे कि, आपल्या प्रमुख पुढा-यांच्या मनावर मुसलमानांचे विशेष दडपण होते; त्यांच्या उल्लेखाशिवाय आपले राष्ट्रीयत्व पुर्ण होणार नाही असे त्यांनी वाटत होते. नंतर कोणीतरी म्हटले कि, या स्पष्टीकरणाला जातीयवादाचा वास येत आहे तेंव्हा या रंगांचा नवीन अर्थ लावण्यात आला. भगवा रंग त्यागाचे प्रतिक, पांढरा रंग पावित्र्याचे, आणि हिरवा शांततेचे. त्या काळात काँग्रेसच्या कार्यकारिणी बैठकीत ही चर्चा झाली होती. आपले राष्ट्र हे वैभवशाली भूतकाळ असलेले प्राचीन राष्ट्र आहे. आपल्याशी आपला स्वताचा ध्वज नव्हता काय ? हजारो वर्षांच्या काळात आपल्या राष्ट्राला एकही मानचिन्ह नव्हते काय ? निश्चित होते, मग आपल्या नेत्यांच्या मनात एवढी पोकळी का निर्माण झाली ? आपली राज्यघटनाही पाश्चिमात्य देशातील वेगवेगळ्या राज्यघटनांतील थोडीथोडी कलमे एकत्र जोडून केलेली एक बोजड राज्यघटना आपले म्हणावे असे त्या घटनेत काहीच नाही. आपल्या राष्ट्रजीवनाचे उद्दिष्ट काय, आपल्या जीवनाचे मुलाधार तत्व कोणते आहे ? यासंबंधी घटनेच्या मार्गदर्शक तत्वामध्ये एका अक्षराने तरी उल्लेख आहे का ? संयुक्त राष्ट्राच्या किंवा लीग ऑफ नेशन्सच्या घोषणापत्रकातील काही ठिसूळ सिद्धांत आणि अमेरिकेच्या आणि ब्रिटीशांच्या राज्यघटनेतील काही तुकडे एकत्र करून त्यांची गोधडी तयार करावी लागली. (इंग्लडची राज्यघटना अलिखित आहे, बुद्धीभेद करू नका मनुवाद्यांनो !) द लीगसी ऑफ लोकमान्य या ग्रंथात थिओड्रे शे यांनी म्हटले आहे, "भारताच्या राज्यघटनेत स्वराज्य, धर्मराज्य,
शासनाचे लक्ष्य व जीवनउद्दिष्ट यांचा परस्परसंबंध आदी कल्पनांचा उल्लेखदेखील नाही. वेगळ्या शब्दात सांगायचे म्हणजे भारताच्या राज्यघटनेत भारतीय विचारप्रणाली किंवा राजकीय तत्वज्ञान यांचे किंचीतही प्रतिबिंब दिसत नाही".

खंडन - राज्यघटना जरी अलिखित असली तरीही तत्वे स्वीकारलीच ना !

("राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा तिरंग्याला विरोध ?") १७ ऑगस्ट २०१७ रोजी साम टीव्हीवरील आवाज महाराष्ट्राचा ह्या कार्यक्रमात संजय आवटे संपादक होते. राजरत्न आंबेडकर (बौद्ध महसंघ), डॉ. रत्नाकर महाजन (काँग्रेस प्रवक्ते), डॉ. विवेक कोरडे (गांधीवादी), आशुतोष आडोणी, सौरभ कर्डे (रा. स्व. संघ) ह्यांनी ह्या कार्यक्रमात भाग घेतला होता.

संजय आवटे - संघाने आपल्या शाखेवर कधीही तिरंगा फडकविला नाही, त्यामुळे त्यांनी आम्हाला देशभक्ती शिकवू नये असे विधान राहुल गांधींनी केले होते.
२००२ तीन तरूणांनी संघाच्या मुख्य कार्यालयावर तिरंगा फडकविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी संघाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना रोखले, हे प्रकरण न्यायालयात गेले तेंव्हा तिघांची निर्दोष मुक्तता झाली. केरळमध्ये सरसंघचालकांना ध्वजारोहण करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न झाला. संघाचा जन-गण-मनला विरोध आहे, कारण ते वंदे मातरमला मानतात.

इंदौर - (२३ फेब्रु. २०१६)
सोमवारी सकाळी मध्यप्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अरूण यादव ८०० कार्यकर्त्यांसह राजवाडा परिसरापासून संघ कार्यालयावर मोर्चा वळविला. यावेळी रस्त्यात प्रचंड पोलिस बंदोबस्त होता. संघ कार्यालयापासून काही अंतरावर पोलिसांनी बॅरिकेट्स लावून काँग्रेस कार्यकर्त्यांना रोखले. यादव यांच्याशी चर्चा करून २० निवडक कार्यकर्त्यांना रामबाग संघ मुख्यालयात जायची परवानगी मिळाली. मात्र संघ कार्यालयात प्रवेश मिळताच काँग्रेस कार्यकर्त्यांवर आश्चर्यचकित होण्याची वेळ आली. कारण या ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी लाल गालिचे अंथरून आणि तिलक लावून त्यांचे स्वागत करण्यात आले. संघ पदाधिका-यांचे स्वागत स्वीकारल्यानंतर यादव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी संघ कार्यालयाच्या भगव्या ध्वजाच्या शेजारी तिरंगा फडकविण्यात आला.
त्यानंतर यादव आणि त्यांच्या सहकार्यांना नाश्ता देण्यात आला. संघस्वयंसेवकांनी ख-या अर्थाने देशप्रेमाचा स्वीकार करावा, यासाठी आपण त्यांच्या ठिकाणी तिरंगा फडकवला असून तो रोज फडकावा
अशी अपेक्षा यादव व्यक्त केली. तिरंगा राजकारणाचे साधन नसून भावनेचा विषय आहे, असे मत संघाचे विभाग कार्यवाह दिलीप जैन यांनी व्यक्त केले.

(एवढी महत्वाची घटना राहुल गांधींनी सांगितली नाही,
त्यांनी नाही सांगितली तरी फरक नाही पडत. कारण ते राजकारणी आहेत. पण संजय आवटेंसारख्या जवाबदार संपादकांना ही गोष्ट माहित नसावी ?
२००२ ची घटना माहित आहे, पण ह्या घटनेचा उल्लेख का नाही केला ? ह्याचा अर्थ कार्यक्रमाचा हेतू स्वच्छ नव्हता, एका विशिष्ट हेतूनेच हा कार्यक्रम सादर झाला होता. २००२ ची घटना म्हणजे ते तिघे दादागिरी करून घुसले होते, हा प्रश्न शांततेच्या मार्गाने आणि चर्चा करून सोडविता आला असता. पण तसे केले नाही.
बंच ऑफ थॉट्समध्ये जन-गण-मनवर एका अक्षराने टीका केलेली नाही, त्याला विरोध बामसेफचा आहे.
Bamcef on Jan gan man असे युट्यूबवर टाकून बघा. वामन मेश्राम म्हणतात कि, "एका ब्राह्मणाने हे गीत इंग्लंडच्या राजाच्या स्वागतासाठी लिहीले आहे.
आम्हाला संधी मिळाली तर २ दिवसात राष्ट्रगीत लिहू".
आवटे विनाकारण बामसेफच्या पावत्या संघाच्या नावाने फाडत आहेत. संघ वंदे मातरमला मानतो, पण कधीही जन गण मनला विरोध केलेला नाही. आमची शाखा जिथे लागते तिथल्या शाळेत जन-गण-मन सुरू झाले कि, खेळ थांबून स्तब्ध उभे राहतो.)

चर्चा

राजरत्न आंबेडकर - बंच ऑफ थॉट्स संघाचे संविधान आहे. त्यानुसार संघ कार्यशैली राबवतो, ध्वजारोहणाला मनाई असून मोहन भागवतांनी ध्वजारोहण केले.
(रा. स्व. संघ ही शब्दप्रामाण्यवादी वा ग्रंथप्रामाण्यवादी संघटना नसून काळाप्रमाणे वाढत जाणारी जिवंत आहे,
संघाने कधीही तिरंगा फडकावू नये अशी कोणत्याप्रकारे सुचना केलेली नाही. उगाच गैरअर्थ काढू नये.
तसेही एका देशात दोन संविधान कशी असतात ?)

डॉ. विवेक कोरडे - डॉ. हेडगेवारांनी १९३० साली जाहिरपत्रक काढले कि, संघाच्या शाखेवर राष्ट्रध्वजाऐवजी भगव्याला वंदन करा. गोळवलकर गुरूजी म्हणतात कि, तिरंगा राष्ट्राचे अवमूल्यन आहे. १९४६ ला ते एका भाषणात म्हणाले कि, हिंदू समाज तिरंगा कधीही स्वीकारणार नाही.
(संघाने २६ जानेवारी १९३० रोजी शाखांवर स्वातंत्र्यदिवस साजरा केला. भगवा ध्वज स्वीकारला त्याचे कारण हिंदू समाजात सांस्कृतिक ऐक्य घडविणे होय. गुरूजींना एवढंच सांगायचे होते कि, आपल्याला दुस-यांची नक्कल करायची आवश्यकता नाही. संघावर जेंव्हा पहिली बंदी आली, त्यानंतर गुरूजींनी एक पत्रक काढले होते. त्यामध्ये राष्ट्रध्वज आणि संविधानाविषयी संघाची काय भूमिका आहे ते स्पष्ट सांगितले.)

भारतीय संविधान आणि राज्यध्वजावर निष्ठा :
वास्तविक कोणत्याही स्वतंत्र देशात यासंबंधी शंका निर्माण होऊ नये. प्रत्येक भारतीय नागरिकाला या देशाविषयी प्रेम व निष्ठा आहे. तो त्याच्या अभिमानास्पद असा जन्मसिद्ध अधिकार आहे. संघाचा प्रत्येक स्वयंसेवक मातृभूमीसाठी आपले सर्वस्व अर्पण करण्याची प्रतिज्ञा घेतो. अन्य कोणत्याही नागरिकांप्रमाणे संघ स्वयंसेवकही देश, देशाचे संविधान आणि इतर प्रतीके यांच्याशी एकनिष्ठ आहे. ध्वज हे असेच महत्वपुर्ण प्रतिक आहे. यापुर्वी म्हटल्याप्रमाणे, ध्वजाचे रक्षण करणे आणि त्याचा आदर करणे हे इतर भारतीयांप्रमाणेच प्रत्येक स्वयंसेवकाचे अभिमानास्पद कर्तव्य आहे. संघाचा भगवा ध्वज आणि घटना समितीने स्वीकारलेला राज्यध्वज यांच्यात कोणीही गोंधळ करणार नाही अशी मला खात्री आहे. खरे म्हणजे कायद्याप्रमाणे कोणताही पक्ष किंवा संघटना सरकारी नियंत्रणाच्या बाहेर राज्यध्वजाचा उपयोग करू शकत नाही. (समग्र श्रीगुरूजी खंड - १० : ७५, ७६)

सौरभ करडे - १९३२ साली फैजापुर येथे अधिवेशन झाले. तिथल्या एका मैदानावर ध्वजारोहण झाले, मध्येच तिरंगा अडकला. तेंव्हा किशनसिंग रजपूत ह्या स्वयंसेवकाने त्या खांबावर जाऊन ध्वजाचा गुंता सोडविला. डॉ. हेडगेवारांनी चांदीची वाटी देऊन त्याचा सत्कार केला. (हा प्रसंग सरसंघचालक डॉ. मोहन भागवत ह्यांनी दिल्लीमध्ये तीन दिवसांच्या कार्यक्रमात सांगितला होता.)

डॉ. रत्नाकर महाजन - विविध क्षेत्रांमधून ऐकायला मिळणा-या लोककथा आणि काल्पनिक कथा यांचे महत्व लोकवांङमयात असतं. स्वातंत्र्य आंदोलन, आणि महात्मा गांधींनी केलेले नेतृत्व याला संघाचा पूर्ण विरोध होता. बंच ऑफ थॉट्समध्ये असे लिहीले आहे कि, भारतातील हिंदूंनी आपली शक्ती ब्रिटीशांच्या विरोधात खर्च करू नका. कारण हिंदूंचे खरे शत्रू मुसलमान, ख्रिश्चन, कम्युनिस्ट अाहेत.
(संघसंस्थापक डॉ. केशव बळिराम हेडगेवार हे प्रथम विदर्भ काँग्रेसचे नेता होते. संघस्थापनेनंतर त्यांनी जंगल सत्याग्रहात भाग घेतला होता, त्यासाठी त्यांना १ वर्ष सक्तमजुरीची शिक्षा झाली. १९२८-२९ च्या दरम्यान सायमन कमिशनच्या विरोधात विदर्भात प्रचार करण्याचे दायित्व डॉ. हेडगेवारांवर होते. २६ जानेवारी १९३० सालचा स्वातंत्र्यदिवस संघाच्या शाखांवर साजरा झाला. भैय्याजी दाणींच्या नेतृत्वाखाली १०० स्वयंसेवकांनी भागानगर सत्याग्रहात भाग घेतला.
डॉ. हेडगेवार कधीही देशाच्या दुरावस्थेसाठी मुसलमान व ब्रिटीशांना दोष देत बसले नाहीत. तर हिंदूंमध्ये राष्ट्रीयत्व निर्माण करून देशाचे दिवस बदलायचे असा त्यांचा कल होता. त्याच वाटेवर गुरूजींपासून सर्व सरसंघचालक आजतागायत वाटचाल करत आहेत.
मुसलमान, ख्रिश्चन, कम्युनिस्ट देशासाठी धोकादायक असल्याचे म्हटले आहे. त्या काळातील कारणे व घटना
यांचा आढावा घ्यावा, सोयीस्कर अर्थ लावू नये. "आपली शक्ती राखून ठेवा इ. कोणतेही विधान विचारधनमध्ये नाहीत".)

सौरभ करडे - १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी रोजी भारतातील सर्व संघशाखांवर भारतमातेचं पूजन केले जाते.

आशुतोष आडोणी - भगवा ध्वज जेवढा संघाला प्रिय आहे, तितकाच तिरंगा सन्माननीय आहे. प्रत्येकाची सन्मान व्यक्त करायची पद्धत वेगळी आहे. ध्वजाचा मुद्दा आला तेंव्हा अनेक प्रवाद आले, वेगळी मतं मांडणारी मंडळी राष्ट्रीय प्रतिकांचा अनादर करतात का ? भागानगरचा सत्याग्रह किंवा गोवा सत्याग्रहात मोहन रानडे ह्या स्वयंसेवकाने भाग घेतला होता. काश्मिरच्या लाल चौकात मुरली मनोहर जोशी ह्यांनी तिरंगा फडकविला होता.
("प्रत्येकाची सन्मान व्यक्त करायची पद्धत वेगळी असते". ह्या वाक्याला आवटेंनी "अच्छा, अच्छा" असे उद्गार काढले. वेगळ्या विचारधारा असणं आणि त्या स्वीकारणे लोकशाहीचे सौंदर्य आहे अशा त्यांच्या गप्पा निव्वळ बोलण्यापुरत्या असतील. त्याचे आचरण कधीही जाणवत नाही !)

डॉ. विवेक कोरडे - जाणीवपूर्वक अल्पसंख्य समुदायांच्या शाळांवर तिरंगा फडकविला जातो, पुढे व्हिडीओ रेकॉर्डिंग केले जाते.
(१५ ऑगस्ट २०१८ रोजी उत्तरप्रदेशतील महाराजगंज मदरशात ध्वजारोहण केल्यावर राष्ट्रगीत गाण्यास मौलवींनी विरोध केला. मोहम्मद जुनैद अन्सारी, मोहम्मद अजलूर रेहमान, मोहम्मद निजाम ह्या तिघांना पोलिसांनी अटक केली. ह्या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला. आवटेंनी ह्यावर डिबेट बसविली असेल तर त्यांनी दाखवावी.)

सौरभ करडे - हमीद अन्सारी तिरंग्याला सलामी न देता जायचे.

डॉ. रत्नाकर महाजन - राष्ट्रपतींना दिली जाणारी सलामी आणि तिरंग्याला दिली जाणारी सलामी एकट्यानेच स्वीकारयाची असा शिष्टाचार आहे.

अन्वर राजन - सरकारी शाळा, खाजगी ठिकाणी देखील ध्वजारोहण केले जायचे. 

आशुतोष आडोणी - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून कधीतरी १९४७ पासून कधीतरी तिरंग्याचा अवमान झाला का ? (मध्येच आवटे हसतात, जणू संघाच्या मुख्यालयावर तिरंगा न फडकावणे हा जणू अक्षम्य गुन्हा आहे.) त्याचा सन्मानच झाला आहे. खिलाफतला महात्मा गांधींनी का पाठिंबा दिला ?, मौ. मोहम्मद अलींनी वंदे मातरमला का विरोध केला ? संघाने कधीही तिरंग्याचा अवमान केलेला नाही.

डॉ. रत्नाकर महाजन - संघाला भगव्या एवढा तिरंगा प्रिय आहे, तर प्रभात शाखांवर भगव्यासोबत तिरंगा का फडकत नाही ? जिंदल ह्यांचे अर्धवट उदाहरण दिले.
कॅबिनेट मंत्र्यांच्या गाडीवर तिरंगा असणे प्रोटोकॉलचा भाग आहे. जिंदल सुप्रीम कोर्टात गेले तेंव्हा असं म्हणाले कि, ध्वज संहितेचं पालन करून माझ्या घरावर रोज तिरंगा फडकवायचा आहे. तो काळ अमेरिकन राष्ट्रवादाला भरता आल्याचा काळ होता. अमेरिकन लोकांच्या हातात सतत राष्ट्रध्वज असायचा. सुप्रीम कोर्टाने असा निकाल दिला कि, ध्वज संहितेच्या आधीन राहुनच खाजगी लोक आपल्या घरावर तिरंगा फडकवू शकतात.

संजय आवटे (सौरभ कर्डेंना) तिरंग्याला हिंदूराष्ट्र अपेक्षित नाही हे तुम्ही मान्य कराल का ? भारत हिंदूराष्ट्र वाटत असेल तर तिरंगा स्वीकारता येत नाही.

डॉ.विवक कोरडे - कोणा एका समाजाची ते राष्ट्रनिष्ठ आहे कि देशद्रोही ह्याची परिक्षा घेणारे हे कोण ? (फेक्युलरांचा आवडता डायलॉग "देशभक्तीची सर्टिफिकीट्स वाटणे". चार शब्दात ह्यांच्याविरोधात बोलले कि, लगेच मनुवादी, नथुरामवादी, घटनाविरोधी, लोकशाहीविरोधी असे शिक्केे मारायचा काय प्रकार आहे ?)  हे जे भगवा तिरंग्याचे कवच आहे, ते शब्द राहु दे त्यांच्यापाशी ! हिंदूराष्ट्रावादाचा उगम पिस्तुलातून होतो. १९१८ नंतर एकही गोळी मुसलमान आणि ब्रिटीशांना लागली नाही, ती १९४८ पर्यंत महात्मा गांधींसाठी राखून ठेवली होती. (हिंदूत्ववाद्यांना "गांधींचा खूनी" म्हणायची खोड अद्यापही मरायचं नाव घेत नाही. पुढे स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भगतसिंग ह्यांची तुलना करून एकाला गद्दार तर दुस-या हुतात्मा दाखवून आपल्या मानसिक विकृतीचे प्रदर्शन मांडले.) (काय म्हणे), तर विविध विषयांची सरमिसळ करून विषय भरकटवण्यात ज्यांची स्पेशालिटी आहे.(तर इतिहासाचे विकृतीकरण करण्यात स्वता मात्र पीएच. डी. केली आहे. उदा - मोदीजी, सावरकर माफीवीर तर भगतसिंग क्रांतिकारी होते ! Right angles 15 May 2018). त्यामध्ये"सावरकरांच्या कारकिर्दीत एकही गोळी उडाली नाही, ती १९४८ पर्यंत गांधींसाठी राखून ठेवली होती" अशी मुक्ताफळे उधळली होती. त्यांना कदाचित दुर्गाभाभी व्होरा ,पृथ्वीसिंग आझाद, गणेश रघुनाथ वैशंपायन ही नावे माहिती नव्हती.

संजय आवटे - अहमदशहा अब्दाली राहु दे, पण इंग्रजांच्या विरोधात भगव्या झेंड्याने का रक्षण केले नाही ?

१९२६ सालात संघस्वयंसेवकाला प्रतिज्ञा दिली जाऊ लागली. संघ प्रतिज्ञा - "सर्वशक्तीमान परमेश्वर आणि आपल्या पुर्वाजांचे स्मरण करून मी प्रतिज्ञा करतो की,
पवित्र हिंदू धर्म व हिंदू संस्कृतीचे रक्षण करून हिंदू राष्ट्राला स्वतंत्र करण्यासाठी मी संघाचा घटक होत आहे. संघाचे काम प्रामाणिकपणे, निस्वार्थ बुद्धीने आणि तन-मन-धनपूर्वक करीन आणि ह्या व्रताचे मी आजन्म पालन करीन".

१९४२ ची चळवळ सुरू झाल्यानंतर आपणही या चळवळीत पडून स्वातंत्र्यकार्यात शक्य तेवढा हातभार लावावा असा विचार डॉक्टरांच्या तालमीत सुरूवातीपासून असलेल्या काही प्रांत प्रचारकांच्या मनात आला. १९४२ साली गाजलेल्या आष्टी चिमूर (विदर्भ) खटल्यात संघ स्वयंसेवकांचा प्रामुख्याने भाग होता. सानेगुरूजी भूमिगत असताना पुणे जिल्हा संघचालक श्री भाऊसाहेब देशमुख ह्यांच्या घरी होते.
देशमुखांच्या घरी महाराष्ट्रात गाजलेल्या पत्री सरकारच्या बैठकी व्हायच्या. १९४८ साली गांधीहत्येनंतर श्री. देशमुख ह्यांना अटक झाली. तेंव्हा श्री. यशवंतराव चव्हाण यांना पत्रीसरकारमधल्या एका कार्यकर्त्याने कळविले कि, १९४२ साली ज्या देशमुखांच्या घरी
आपण बैठकी घेत होतो, त्यांना अटक झाली आहे.
श्री. चव्हाण मोठ्या पदावर नव्हते, तरीही देशमुखांची सुटका झाली.

दिल्लीच्या चांदणी चौकातील राणी व्हिक्टोरियाच्या पुतळ्याची छत्री संघ स्वयंसेवक श्री. चंद्रकांत भारद्वाज यांनी मोडून इंग्रज सत्तेविरूद्ध द्वेष व्यक्त केला.

नागपुरच्या शुक्रवार दरवाज्याजवळील (आता गांधी दरवाजा) एक म्हातारा मौलवी म्हाणायचा कि, "कोण म्हणतो कि, हे सैन्य मुस्लिमविरोधी आहे. ते इंग्रजविरोधीच आहे". १९३२ मध्ये १२०० गणवेशधारी स्वयंसेवकांचे संचलन झाले त्याचा ब्रिटीशांना धसका बसला होता. १५ डिसेंबर १९३२ मध्ये सेंट्रल प्रोव्हिन्सच्या गर्व्हनरने आदेश काढून सरकारी
कर्मचा-यांना संघाच्या शाखेत जायला बंदी घातली.

१९२९ साली काँग्रेसने स्वातंत्र्याचा ठराव करण्यापुर्वीही त्यासाठी प्रतिज्ञाबद्ध करण्याची योजना ज्या महापुरूषाने  आखली, समर्पित जीवनाचे असंख्य कार्यकर्ते ज्याने तयार केले, कसल्याही मानसन्मानाची अपेक्षा न ठेवणा-या महापुरूषाचे नाव स्वातंत्र्यासाठी लढा लढणा-यांच्या यादीतही असू नये हे विसाव्या शतकातील भारतीय इतिहासाचे एक शोकांत प्रकरण वाटते.

अठरा स्वयंसेवकाच्या टोळीने दादरा-नगरहवेली मुक्त करून दाखविली. या टोळीत सुधीर फडके, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, विष्णु भोपळे, विश्वनाथ नरवणे, नाना कारजेकर मंडळी होती. २ ऑगस्ट १९५४ रोजी गाफील पोर्तुगीज रक्षकांवर हल्ला करून अशोकचक्रांकित तिरंगा फडकविला. या टोळीचे प्रमुख नाना कारजेकर होते. या टोळीला मुंबई पोलिसांचे भरपुर सहकार्य होते, शस्त्रांचा पुरवठा मुंबई पोलिसांनीच केला होता. श्री. ओकांना पोर्तुगीज सैनिकांची गोळी लागली. अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे, गोवा सत्याग्रहात मोहन रानडे ह्यांनी भाग घेतला होता. त्यावर त्यांनी "सतीचे वाण" हे पुस्तक लिहीले. (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ - काल, आज आणि उद्या : १२, १३, १४, १५, १३३)

हुतात्मा शिवराम हरी राजगुरू हेसुद्धा काही काळ संघाचे स्वयंसेवक म्हणून कार्यरत होते, त्यांची व डॉ. हेडगेवारांची भेट अमरावतीला झाली होती. राजगुरूंवर बाबाराव सावरकरांच्या विचारांचा पगड होता. (क्रांतिकारक राजगुरू - डॉ. सच्चिदानंद शेवडे,
शोध सावरकरांचा - १४१.)

ह्या पुराव्यांमुळे संघाचा भगवा कुठे लपला होता ?, स्वातंत्र्यसंग्रामात ज्यांचा सहभाग शून्य आहे ! असे बेधडक आणि कसलेही तारतम्य न बाळगता खोटं
बोलणा-या डॉ. कोरडेंसह अन्य पुरो(अधो)गामी, सेक्यु(फेक्यु)लर ह्यांना सणसणीत चपराक बसेल !

राजरत्न आंबेडकर - तिरंग्याचा वापर मुस्लिमांच्याविरोधात नसून एस.सी, एस.टी, ओबीसींच्या विरोधात आहे. राष्ट्रवादाच्या नावाखाली दोन समुहांमध्ये तंटे निर्माण करायचे आहेत. ब्राह्मणांचे संघटन गावपातळीवरसुद्धा उभे राहणार नाही, म्हणून हिंदू शब्दाचा आधार घतला. मुस्लिमांच्याविरोधात एस.सी, एस.टी, ओबीसींच्याविरोधात त्यांचा वापर केला जातो. ("आपल्याकडे सर्व जातींना संघटित करणारे जातीयवादी असतात, आणि विशिष्ट जातींचे नेतृत्व करणारे प्रतिनिधी असतात". राजरत्न आंबेडकरांच्या विधानावरून प्रत्यय येतो !)

संजय आवटे - आशुतोष आडोणी ! खरोखरच हिंदूराष्ट्राच्या नावाखाली ब्राह्मणी राष्ट्रवाद राबवला जात आहे का ?

आशुतोष आडोणी - हे अत्यंत गैर आहे !

अन्वर राजन - भगव्या ध्वजाचे अनेक प्रकार आहेत,
त्यातील वारकरी संप्रदायाचा भगवा सर्वसमावेशक आहे. वारकरी संप्रदायात अनेक पंथाचे लोक आहेत.
संत तुकाराम अल्लाहची स्तुती करतात, सुफी संत रहीमान कृष्णभक्ती करतात. ही भारतीय परंपरा आहे.
द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत तर सावरकरांनी मांडला होता,
जिन्ना आणि सावरकरांच्या सिद्धांतामध्ये काही फरक नव्हता. (सावरकर म्हणाले कि, "जगातील सर्व मुसलमान स्वताला खलिफाच्या नेतृत्वाखाली एक राष्ट्र समजतात (मिल्लत - म्हणजे आपण एक धार्मिक राष्ट्र आहोत), पण राजकीय लोकशाहीच्या दृष्टीने हिंदू हेच राष्ट्र आहेत. अनादी काळापासून हा देश आमचा आहे,
जे अल्पसंख्य आहेत ते आक्रमक म्हणून घुसले आहेत". अखंड भारत टिकविण्यासाठी पाकिस्तानची फाळणी करा, असा उपाय सावरकरांनी सुचविला होता.
"याल तर तुमच्यासह, नाही तर तुमच्याशिवाय, आणि विरोधाल तर विरोध उच्छेदून स्वराज्य निर्माण करू" अशी त्यांची ठाम भूमिका होती. गांधींनी मात्र अनेकदा द्विराष्ट्राला पाठिंबा दिला होता. सावरकरांपूर्वी सर सय्यद अहमदखान, मोहम्मद इक्बाल, रेहमतअली चौधरी (पाकिस्तान कल्पनेचे जनक) ह्यांनी द्विराष्ट्रवाद मांडला होता.)

शेवटी कार्यक्रमाची सांगता करताना आवटे म्हणाले कि,
"एकाचवेळी हिंदूराष्ट्र आणि तिरंगा ह्या दोन डगरींवर हात ठेवून चालणार नाही, तिरंग्यामागचे अधिष्ठान समजले पाहिजे".
(स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्या घरावर स्वातंत्र्यदिनादिवशी तिरंगा फडकविला होता, तेसुद्धा हिंदूराष्ट्रवादी होते ! हे आवटेंना माहित असल्याची अपेक्षा करतो. कट्टर हिंदूत्ववादी असणा-या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांचे पार्थिव तिरंग्यातच गुंडाळण्यात आले होते. म्हणजे ह्या महान
लोकांना तिरंग्याचे अधिष्ठान समजत नव्हते असं म्हणावे लागेल. संघाचा हिंदूराष्ट्रवाद चालत नाही आणि अन्यांचा चालतो, असा भेदभाव करायची पद्धत असेल तर स्पष्ट करावे !) भारताने स्वातंत्र्य मिळवले तेंव्हा संघाच्या मुख्यालयावर आणि शाखांवर तिरंगा फडकला होता. "संघाने ५० वर्षे आपल्या मुख्यालयावर तिरंगा फडकावला नाही" असे सूर काढून स्वयंसेवकांना आरोपीच्या पिंज-यात उभे करणारे फेक्युलर्स स्वता राष्ट्रीय प्रतिकांचा सन्मान करत नाहीत. ह्याची माहिती पुढच्या भागात मिळेल.
क्रमशा...

Comments

Popular posts from this blog

दोन वाचाळवीर -

दोन तोंडे नको त्यावेळी उचकटली गेली आहेत. एक आहेत मुस्लिमांचे पार्ट टाईम कैवारी मौलाना जावेद अख्तर, आणि दुसरे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे रामभक्त सीताराम येचुरी. हे दोघेही डाव्या विचारांचे असल्यामुळे तोंड उचकटणे हा त्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे. भाषणस्वातंत्र्याबरोबर अभिव्यक्तीस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य, व्यक्तीस्वातंत्र्य हे त्यांचे अधिकार आहेत. विशेष म्हणजे ह्या अधिकारांची डाव्यांनी कधीच कदर केली नाही, नेहमीच त्यांची मुस्कटदाबी आणि अवहेलना केली. आता हे आयते मिळाल्याने फुकटची मिरासदारी मिरवत आहेत ! श्रीलंकेतील बाँबस्फोटानंतर मुस्लिम महिलांच्या बुरख्यावर बंदी घालण्यात आली, केरळमध्येसुद्धा बंदी घालण्यात आली. (केरळमध्ये माकपचे सरकार आहे) ३ मे २०१९ रोजी बुरख्याप्रमाणे घुंघटावर बंदी घालावी अशी हास्यास्पद मागणी मौलाना अख्तरांनी केली. सामनात मुस्लिम महिलांच्या बुरख्यावर मागणी घालावी, असा लेख आल्याने खळबळ माजली. त्यापुर्वी श्रीलंकेत अध्यादेश काढून सार्वजनिक ठिकाणी बुरखाबंदी केली, फ्रान्समध्येसुद्धा बुरखाबंदी आहे ! मुस्लिम महिलांनी बुरखा घालणे किंवा न घालणे हा त्यांचा प्रश्न आहे. अख्तर ह...

परत गांधी आमचे सावरकर तुमचे -

नुकतीच एक बातमी वाचनात आली. ती म्हणजे, राजस्थानमधील अशोक गेहलोत सरकारने १० वी च्या शैक्षणिक अभ्यासक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी एक बदल केला आहे. राजस्थानमध्ये ज्या विचाराचं सरकार येतं, तसे बदल पाठ्यपुस्तकातील इतिहासात होतात. भाजपच्या काळात विस्तारात आणलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या इतिहासाला गेहलोत सरकारने कात्री लावली आहे. जेलमध्ये होणा-या त्रासाला कंटाळून वीर सावरकरांनी ब्रिटीशांकडे चारवेळा दयेची याचिका केली आणि सरकारच्या अनुसार काम करण्याची आणि स्वताला पोर्तुगालचा मुलगा असल्याचं सांगितल्याचा उल्लेख केला. ब्रिटीशांनी सावरकरांची याचिका स्वीकारून १९२१ साली त्यांना जेलमधून मुक्त केले. तिथून सुटल्यावर हिंदूमहासभेत प्रवेश करून देशाला हिंदूराष्ट्र बनविणयाची संकल्पना मांडली. दुस-या महायुद्धाच्या काळात ब्रिटीश सरकारला मदत केली. १९४२ च्या "भारत छोडो" या आंदोलनाला सावरकरांनी विरोध केला होता. तसेच महात्मा गांधींच्या हत्येमधील मुख्य आरोपी नथुराम गोडसेला मदत केल्याच्या आरोपाचाही खटला सुरू होता. त्यातून सावरकरांची मुक्तता झाली, अशा आशयाचा इतिहास शिकवला जाणार आहे. सावरकरांच्...