Skip to main content

गुरूजींचे विचारधन : सत्य आणि विपर्यास - भाग २

अंतर्गत धोका (कम्युनिस्ट) -

साम्यवादाचे वाढते संकट हे आपल्या देशातील लोकशाहीच्या गंभीर अपयशाचे द्योतक आहे.
साम्यवाद व लोकशाही यांचे जन्मजात हाडवैर आहे. आर्थिक प्रश्नांबाबत सामान्य जनतेला साम्यवादाचे आकर्षक वाटते, हे पाहुन आपण कम्युनिस्टांच्या मागे राहु नये या हेतूने आपल्या
नेत्यांनी कम्युनिस्टांची भाषा व कार्यक्रम यांचा स्वीकार केला, आणि अशाप्रकारे साम्यवादाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. अशा प्रकारच्या डावपेचांनी कम्युनिस्टांच्या शिडातील हवा काढून घेता येईल अशी ह्या नेत्यांची कल्पना असेल तर तो त्यांचा फार मोठा भम्र आहे.
   आज देशभक्ती, चारित्र्य, ज्ञान यांसारख्या श्रेष्ठ गुणांचे आवाहन कोणीच करत नाही;
(हे सर्व पोट भरल्यानंतर करता येईल, मुर्खपर्णा)
सांस्कृतिक, बौद्धीक, नैतिक विकासवरही कणाचा भर नाही. अशा प्रकारच्या दुबळ्या व विफल मनात साम्यवादाचे बीज लगेच मुळ धरते.

निष्ठांचा अंत : साम्यवादाचा उदय -

मनुष्य केवळ भाकरीवर जगत नाही. (आणि भाकरीशिवायही जगू शकत नाही) ज्याच्यासाठी जगावे किंवा मरावे अशी काही जीवननिष्ठाही असावी लागते. अशी एखादी जीवननिष्ठा नसेल तर जीवनाला कोणतीही दिशा वा अर्थ राहत नाही, मनुष्य भलतीकडेच भरकट जातो. तो हताश होतो. अशा अवस्थेत जीवन जगणे अशक्य आहे. काळ, अंतरिक्ष, जीवन आणि विश्व या ख्रिश्चन धर्माच्या सा-या कल्पनांना विज्ञानाने सुरूंग लावला. धर्मावरील श्रद्धा नष्ट झाली. पण विज्ञानावरील श्रद्धेच्या रूपाने एक नवी दिशा युरोपला मिळाली. दुस-या शब्दात सांगायचे म्हणजे विज्ञान त्यांचा नवीन धर्म झाला. ज्याप्रमाणे कोणत्याही धर्मात ईश्वर सर्वज्ञ व सर्वशक्तीमान असल्याचे सांगितले असते त्याचप्रमाणे विज्ञानही सर्वज्ञ आणि सर्वशक्तीमान आहे असे मानू लागले.

प्रतिक्रियात्मक प्रयत्नातील धोका -

साम्यवादाविषयीचे आकर्षण नष्ट करण्यासाठी आपल्या देशात विविध प्रकारे प्रयत्न सुरू आहेत. काही लोकांना असे वाटते कि, विनोबांनी सुरू केलेल्या भूदान-चळवळीमुळे साम्यवादासंबंधी लोकांचे आकर्षण नाहीसे होईल. परंतु विनोबांचे काही अदुरदृष्टीचे अनुयायी साम्यवाद्यांप्रमाणेच 'कसेल त्याची जमीन' अशी घोषणा करतात किंवा तुमच्यापाशी जे आहे ते स्वखुशीने तर तेथे साम्यवाद निमार्ण होईल आणि तुमचे सर्वस्व जबरदस्तीने हिसकावून घेईल असे धमकावीत असतात.
   हे आडवळाने मान्य करण्यासारखे आहे. शिवाय यामुळे सामान्य माणसाच्या मनात असाही संदेह निर्माण होईल कि, आपला उद्धार करण्याच्या नावाखाली या ज्या सर्व चळवळी चालू आहेत त्या अर्धवट आहेत, फसव्या आहेत.
तो असं म्हणेल कि, "साम्यवाद सर्वत्र पसरू लागला आहे, म्हणून तुम्ही सर्व सुधारणा आणि आश्वासने घेऊन पुढे आलात. यापेक्षा रोखठोक बोलणारे साम्यवादी अधिक बरे ! निदान ते प्रामाणिक असून त्यांच्यात साहस आहे. त्यांच्या मनातील विचार खरे असल्याने आमचा त्यांच्यावर विश्वास आहे". योग्य आणि विधायक जीवननिष्ठा (काय भानगड ?) निर्माण केल्या तर सर्वसामान्य जनता साम्यवादाच्या अनिष्ट आकर्षणातून मुक्त होईल. जोपर्यंत आर्थिक विषमता अस्तित्वात आहे तोपर्यंत साम्यवाद होणे अपरिहार्य आहे, असे म्हणणारेही काही लोक आहेत. परंतु साम्यवादाची भरभराट ज्या परस्परविद्वेषातून होते, त्याचे मुळ आर्थिक विषमता नाही. हे त्याचे मुळ कारण आहे.
उदा - आपण रोज ३-४ रूपये कमाई करणा-या रिक्षावाल्याला अरे, तुरे म्हणून हाका मारतो; केवळ महिन्याकाठी केवळ साठ रूपये मिळविणा-या कारकुनाला "बाबूजी" म्हणून बोलवतो. दृष्टिकोनातील असमानता जीवनाच्या सर्वच क्षेत्रात पसरली आहे आणि त्यातूनच परस्परविद्वेषाची भावना जन्माला येते. आपल्या जीवनात अलीकडे शिरलेली ही विकृती आहे.
आपल्या तत्वज्ञानामुळे कोणीही उच्च वा नीच ठरत नाही. प्रत्येक कर्म एकाच समाजरूपी परमेश्वराची पूजा आहे. ही शुद्ध भावना पुन: जिवंत करण्याची आवश्यकता आहे.
(समजा उद्या प्रत्येकजण एकमेकास बाबूजी म्हणू लागले तर समानता येईल ? समजा कारकुनानेही रिक्षावाल्यास सर म्हणायला सुरूवात केली तर त्याच्या आर्थिक स्थितीत फरक पडेल काय ? त्याच्या पोटाची भूक केवळ इतक्यावर भागेल काय ?)

मतपेट्यांमार्फत समाजवाद -

आपल्या देशात साम्यवाद वाढल्याचे दुसरेही कारण आहे; आणि ते म्हणजे आपल्या सरकारचे सध्या धोरण. समाजवाद हेच आपले लक्ष्य असल्याचे सरकारने जाहिर केले आहे.
(समाजवाद आणि साम्यवाद यांमध्ये तत्वत: काहीच फरक नाही. दोहोंचे फक्त मार्ग वेगळे आहेत इतकेच !) आपले नेते असे सांगतात की,
आम्ही रशिया व चीनप्रमाणे बंदुकीच्या साह्याने नव्हे, तर मतपेट्यांच्या मार्गाने समाजवाद आणणार आहोत. याचा एकमेव अर्थ असा की,
रशिया आणि चीनमधील लोकांहून आपल्या देशातील समाज खुप वेगळा आहे. बहुधा चीन व रशियातील लोक जिवंत, जागृत होते; आणि त्यांना दडपून टाकण्यासाठी बंदुकीचा वापर केल्यावाचून गत्यंतर नव्हते. आपल्या देशातील लोक बिचारे गरीब, आज्ञाधारक, वीरपूजक आहेत. त्यांचा तो वीरपुरूष त्यांच्यापुढे येऊन म्हणेल की, "मित्रांनो ! असे पुढे या. जरा खाली वाका. मला तुमचे मस्तक धडावेगळे करायचे आहे ! (कॉम्रेड भगतसिंग आणि सावरकर ह्यांचाही अपमान आहे) तर आपले लोक निश्चित त्याच्यापुढे झुकतील, आपले मस्तक पुढे करतील. अशाप्रकारचे आज्ञाधारक लोक असताना बंदुकीच्या गोळीची काय गरजच आहे ? मतपेटी पुरेशी आहे. पुढा-याने सांगितले कि, 'समाजवादाला मत द्या' तर लोक समाजवादाला मत देतील.

विनाशाकडे वाटचाल -

समाजवादाच्या नावाखाली येथे नेमकं काय घडत आहे ? दिसते ते असे कि, या दिशेने आपल्या देशात चाललेले प्रयोग व उपक्रम जे  चीनमध्ये घडले ते त्याचीच कार्बन प्रत आहे.
फरक आहे तो एवढाच कि, चीनमध्ये या सर्व गोष्टी पाशवी हिंसेच्या मार्गाने घडविण्यात आल्या. आपल्याकडे त्याच्यासाठी सोज्वळ प्रचारांचा अवलंब करण्यात येतो. चीनमधील सध्याचे साम्यवादी सरकार प्रथम सत्तारूढ झाले
तेंव्हा आपल्या अनिर्बंध सत्तेला आव्हान देणारी कोणतीही शक्ती शिल्लक राहता कामा नये असे त्यांना वाटू लागले. (कामगारांची अनिर्बंध सत्ता असे म्हणा. काहीतरी लोकशाही म्हणजे बहुसंख्याकांची हुकूमशाही) म्हणून त्यांनी सरदार, राजे-रजवाडे, आणि उद्योगपतींना नाहीसे करून टाकले. (काय वाईट केले ?, शिवाजीनेही वतनदारी नष्ट केलीच ना ?)
समाजवाद आपल्या रक्तात नाही, परंपरेत नाही.
हजारो वर्षांच्या आपल्या प्राचीन राष्ट्रजीवनाच्या परंपरेशी व आदर्शांशी त्याचा यत्किंचितही संबंध नाही. आपल्या येथील कोट्यावधी लोकांच्या दृष्टीने हा विचार परकीय आहे.
   (टेपरेकॉर्डर, यंत्रे, व आत्याधुनिक शस्त्रे आपल्या रक्तात होती का ? आपण वापरतोच ना ? समाजवाद हेही असेच एक शस्त्र आहे. नव्या युगाची अपरिहार्य व्यवस्था आहे. तुमच्या आत्यंतिक राष्ट्रवादाची कीव येते.)

सर्वच दृष्टीने निरूपयोगी -

सैध्दांतिक स्तरावर समाजवादाच्या केंव्हाच चिंधड्या उडाल्या आहेत. आता तर व्यावहारिक पातळीवरही तो अपयशी ठरला आहे. (Prove your statement) खरे म्हणजे लोकशाही व समादवाद या कल्पना परस्परविरोधी आहेत.
(अन् संघ आणि लोकशाही जणू जुनी भावंड आहेत. संघवाले तत्वाने भांडायला कधी शिकणार ? केवळ थिल्लर आरोप शब्दांच्या देखण्या कोंदणात मांडले म्हणजे आपले काम झाले. हीच यांची वृत्ती !)

खंडन -

१. देशभक्ती जर पोट भरल्यानंतर करायची गोष्ट असेल तर स्वातंत्र्यासाठी लढणारे क्रांतिकारक व सत्याग्रही हे चैनीचे जीवन जगत होते, असेच म्हणावे लागेल. सीमेवरचे सैनिक दिवस-रात्र रक्षणासाठी तैनात असतात, त्यांनीही नेहमी जेवायला मिळते असेच गृहीत धरावे लागेल.

२. अन्न आणि निवारा ह्या मूलभुत गरजा मानव आणि मानवेत्तर प्राण्यांमध्ये समान आहेत.
निव्वळ भाकरीवर जनावरंही जगतात. पण आपण माणूस आहोत. आपल्या जीवनाचे लक्ष्य काय, जीवन कसे असावे, कोणती दिशा असावी हे आपण ठरवू शकतो.

३. अर्थातच नाही ! प्रत्येकजण जगण्यासाठी काम करतो, त्यामुळे कोणतेही काम उच्च किंवा नीच नसते.

४. स्वातंत्र्यवीर सावरकरही कॉम्रेड झाले तर ! देवाचे अस्तित्व नाकारणारी आणि श्रमिकांच्या हक्कांसाठी लढणारी जगातील प्रत्येक व्यक्ती कम्युनिस्ट नसते.

५. रशिया, चीनमध्ये काय झाले ? कामगारांच्या सत्तेऐवजी एका विशिष्ट पक्षाची आणि व्यक्तीची हुकूमशाही आली. छत्रपती शिवाजी महाराजांनी वतनदारी नष्ट केली. पण श्रीमंत शेतकरी, जमीनदार ह्यांना देशोधडीला लावले नाही वा त्यांच्या कत्तली केल्या नाहीत.

६. टेपरेकॉर्डर, यंत्रे, अत्याधुनिक शस्त्रे ह्या आपल्या भौतिक गरजा आहे. एखादी विचारसरणी अन्य देशात चांगली व उपयोगी ठरते म्हणून आपल्या देशातही चालेल असे अनिवार्य नाही. जो आपल्या विरोधात बोलतो त्याच्यावर घटनाविरोधी, लोकशाहीविरोधी असे शिक्के मारणे आत्यंतिक राष्ट्रवाद नाही का ?

७. लोकशाही आहे म्हणूनच संघ टिकला आहे. नाहीतर केरळ, त्रिपुरा, प.बंगालची अवस्था माहितच आहे. एखादा विषय जर आपल्या डोक्यावरून जात असेल तर त्याला सोडून देणे शहाणपणाचे ठरते. शब्दांची आणि वाक्यांची मोडतोड करून काहीही निष्पन्न होत नाही.

माओवादी कारवाया -

१. छत्तीसगडमधील सुकूूमा भागात गेल्या वर्षी २४ एप्रिल रोजी माओवादी हल्ल्यात २५ जवान हुतात्मा झाले.

२. यंदा गडचिरोलीच्या २२ एप्रिल रोजी सी-६०
जवानांच्या कारवाईत ४० माओवादी ठार झाले.

३. ४ मे रोजी भामरागड येथे माओवाद्यांनी भामरागड येथे भुुसुरंग स्फोट घडविला, त्यात २१ जवान जखमी झाले.

४. गोंदिया जिल्ह्यातील मंगेझरि येथे २० एप्रिल १९९२ रोजी भूसुरंग स्फोट झाला. त्यात १२ पोलिस हुतात्मा झाले. १० ते १२ गावकरी ठार झाले. काहींना गंभीर दुखापत झाली.

५. १२ मार्च २०१७ रोजी छत्तीसगड येथे माओवादी आणि सीआरपीएफ ह्यांच्यात चकमक झाली. १२ जवान हुतात्मा झाले.

६. माओवाद्यांशी संबंध असल्यामुळे दिल्ली विद्यापीठातील प्राध्यापक जी. एन. साईबाबा याच्यासह पाचजणांना गडचिरोली प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
साईबाबावर हिंसक कारवायांसाठी तरूणांना तयार करणे, त्यांना गडचिरोलीला पाठविणे, माओवादी विचारांचा प्रसार करणे, त्यांच्यासाठी थिंक टँक म्हणून काम करायचे आरोप सिद्ध झाले.

संदर्भ सुची -

विचारधन - १६७, १६८,१६९, १७०, १७१, १७२, १७३, १७४. 

माओवादी बातम्या - महाराष्ट्र टाईम्स.

Comments

Popular posts from this blog

दोन वाचाळवीर -

दोन तोंडे नको त्यावेळी उचकटली गेली आहेत. एक आहेत मुस्लिमांचे पार्ट टाईम कैवारी मौलाना जावेद अख्तर, आणि दुसरे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे रामभक्त सीताराम येचुरी. हे दोघेही डाव्या विचारांचे असल्यामुळे तोंड उचकटणे हा त्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे. भाषणस्वातंत्र्याबरोबर अभिव्यक्तीस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य, व्यक्तीस्वातंत्र्य हे त्यांचे अधिकार आहेत. विशेष म्हणजे ह्या अधिकारांची डाव्यांनी कधीच कदर केली नाही, नेहमीच त्यांची मुस्कटदाबी आणि अवहेलना केली. आता हे आयते मिळाल्याने फुकटची मिरासदारी मिरवत आहेत ! श्रीलंकेतील बाँबस्फोटानंतर मुस्लिम महिलांच्या बुरख्यावर बंदी घालण्यात आली, केरळमध्येसुद्धा बंदी घालण्यात आली. (केरळमध्ये माकपचे सरकार आहे) ३ मे २०१९ रोजी बुरख्याप्रमाणे घुंघटावर बंदी घालावी अशी हास्यास्पद मागणी मौलाना अख्तरांनी केली. सामनात मुस्लिम महिलांच्या बुरख्यावर मागणी घालावी, असा लेख आल्याने खळबळ माजली. त्यापुर्वी श्रीलंकेत अध्यादेश काढून सार्वजनिक ठिकाणी बुरखाबंदी केली, फ्रान्समध्येसुद्धा बुरखाबंदी आहे ! मुस्लिम महिलांनी बुरखा घालणे किंवा न घालणे हा त्यांचा प्रश्न आहे. अख्तर ह...

गुरूजींचे विचारधन : सत्य आणि विपर्यास - भाग ३

आक्षेप क्र. ३ - तिरंगा व राज्यघटनेला विरोध. प्रवाहपतितांची घसरगुंडी - उदाहरणार्थ आपल्या नेत्यांनी आपल्या देशासाठी एक ध्वज तयार केला. त्यांची प्रवाहपतित अवस्था, परानुकर...

परत गांधी आमचे सावरकर तुमचे -

नुकतीच एक बातमी वाचनात आली. ती म्हणजे, राजस्थानमधील अशोक गेहलोत सरकारने १० वी च्या शैक्षणिक अभ्यासक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी एक बदल केला आहे. राजस्थानमध्ये ज्या विचाराचं सरकार येतं, तसे बदल पाठ्यपुस्तकातील इतिहासात होतात. भाजपच्या काळात विस्तारात आणलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या इतिहासाला गेहलोत सरकारने कात्री लावली आहे. जेलमध्ये होणा-या त्रासाला कंटाळून वीर सावरकरांनी ब्रिटीशांकडे चारवेळा दयेची याचिका केली आणि सरकारच्या अनुसार काम करण्याची आणि स्वताला पोर्तुगालचा मुलगा असल्याचं सांगितल्याचा उल्लेख केला. ब्रिटीशांनी सावरकरांची याचिका स्वीकारून १९२१ साली त्यांना जेलमधून मुक्त केले. तिथून सुटल्यावर हिंदूमहासभेत प्रवेश करून देशाला हिंदूराष्ट्र बनविणयाची संकल्पना मांडली. दुस-या महायुद्धाच्या काळात ब्रिटीश सरकारला मदत केली. १९४२ च्या "भारत छोडो" या आंदोलनाला सावरकरांनी विरोध केला होता. तसेच महात्मा गांधींच्या हत्येमधील मुख्य आरोपी नथुराम गोडसेला मदत केल्याच्या आरोपाचाही खटला सुरू होता. त्यातून सावरकरांची मुक्तता झाली, अशा आशयाचा इतिहास शिकवला जाणार आहे. सावरकरांच्...