Skip to main content

गुरूजींचे विचारधन : सत्य आणि विपर्यास - भाग २

अंतर्गत धोका (ख्रिश्चन) -

आपण ख्रिश्चनांसंबंधी विचार करू लागलो, तर काय दिसते ? वरवर पाहणा-याला असे वाटावे कि, हे लोक केवळ निरूपद्रवी आहेत, एवढेच नव्हे तर मानवजातीविषयीच्या सहानुभूतीची व प्रेमाची जणू मूर्तीच आहेत. सेवा, मानवजातीचा उद्धार ह्यांसारखे शब्दप्रयोग भाषणात इतके विपुल असतात कि जणू सर्वशक्तीमान परमेश्वराने त्यांची खास नेमणूक केली आहे.
   ठिकठिकाणी ते शाळा, महाविद्यालये, दवाखाने, अनाथाश्रमे चालवितात. आपल्या देशातील लोक साधेभोळे असल्याने या गोष्टींचा
त्यांच्यावर लगेच प्रभाव पडतो. परंतु या सर्व कार्यात कोट्यावधी रूपये ओतण्यात त्यांचा अंतस्थ हेतू खरोखर कोणता असतो ?
   स्वर्गस्थ राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्रप्रसाद एकदा आसामला गेले होते. त्या पहाडी प्रदेशात ख्रिस्ती मिशनरींनी चालविलेल्या शाळा व दवाखान्यांना
त्यांनी भेट दिली व समाधान व्यक्त केले. तथापि,
भाषणाच्या शेवटी त्यांनी असे सांगितले कि, "तुम्ही फार चांगले कार्य केले आहे यात संदेह नाही. पण याचा उपयोग तुम्ही धर्मांतरासाठी करू नका". परंतु त्यांच्या मागोमाग ज्या मिशन-यांचे भाषणे झाले त्याने नि:संदिग्ध शब्दात सांगितले कि, "या सर्व कार्यामागे केवळ मानव हिताची प्रेरणा असती तर एवढ्या दूरवर कशाला आलो असतो ? एवढा अमाप पैसा आम्ही कशाला खर्च केला असता ? प्रभू येशुच्या अनुयायांची संख्या वाढविणे हे एकमेव उद्दिष्ट ठेवून आम्ही येथे आलो आहोत". अशा प्रकारे त्यांनी आपला हेतू अगदी नि:संदिग्ध शब्दात सांगितला आहे.

धर्माच्या बुरख्याआड राजकारण -

ईश्वर, प्रेषित, किंवा धर्म यांच्या नावाखाली ते केवळ आपले राजकीय महत्वकांक्षा पुढे रेटण्याचा प्रयत्न करतात. ख-या धर्मात बाटवाबाटवीचे, इतरांना त्यांच्या उपासनापद्धती बदल करावयास लावण्याचे काही प्रयोजन नाही. प्राचीन काळी आपल्या देशातून अनेक धर्मप्रचारक दूरच्या देशात गेले. परंतु त्यांनी तिथल्या लोकांवर धर्मांतराची सक्ती केली नाही.
   एकदा एका मिशन-याची व माझी गाठ पडली. इंग्लंडच्या एका आर्चबिशपने लिहीलेले एक पुस्तक त्याने मला दिले आणि म्हटले, "आमच्या कार्याचे स्वरूप ह्या पुस्तकावरून स्पष्ट होईल !". मी ते पुस्तक वाचून काढले. नंतर त्याला परत केले, तेंव्हा त्याने काहीशा उत्सुकतेने विचारले, "आपल्याला पुस्तक कसे वाटले ?" मी उत्तर दिले कि, जर तुमचे आर्चबिशप असे अाहेत तर तुमच्याविषयी काय बोलावे !" माझ्या उत्तराने तो चांगलाच वरमला.
   मी त्याला पुस्तकातील काही परिच्छेद काढून दाखविले. त्यात असे सांगितले होते कि, 'माणसाने रोज दोनदा प्रार्थना केली. आणि दर रविवारी तो चर्चमध्ये गेला, म्हणजे बाकीच्या वेळात शारिरीक उपभोग घेतले, चैन केली तरी हरकत नाही'. खरे म्हणजे हे शब्द येशुच्या शिकवणुकीच्या अगदी विरूद्ध आहेत.
   (गंगेत स्नान केल्यास सर्व पापे नष्ट होतात,
ह्या हिंदू शिकवणुकीप्रमाणे मुर्ख विधान आहे).

खंडन - वस्तुस्थिती ही आहे कि, ह्या शिकवणुकीवर पुरो(अधो)गामी व सेक्यु(फेक्यु)लर मंडळी एक अक्षरही बोलत नाहीत. व्हॅक्टिकन सिटीमध्ये जादुटोण्याचे वर्ग चालविले जातात, मदर तेरेसांना संतपद बहाल केले, मुंबईचा प्रादी सेबिस्टीयन मार्टिन ह्याने "हालेलुया" म्हणत इलाज करायचा दावा केला.
एकानेही तोंड उचकटले नाही.

परकीयांचे षडयंत्र -
पूर्वांचलातील दहशतवादाने ग्रासलेले मिझोराम, नागालँड, मेघालय, त्रिपुरा, मणिपूर हे प्रदेश ख्रिश्चनबहुल आहेत. जगातील चर्चेसकडून योजनाबद्धरीत्या ते असे बनवले गेले आहेत.
सीमेपलीकडील शत्रुराष्ट्राकडून या भागातील बंडखोर संघटनांना शस्त्रे, पैसा, प्रशिक्षण पुरवले जाते. देशाचे लचके तोडण्यासाठी त्यांचा उपयोग केला जात आहे. भारताची शत्रुराष्ट्रे त्यांच्यापैकी अनेकांचा आपले हेतू साध्य करण्यासाठी उपयोग करून घेतात. त्यामुळे विनाकारण सर्व समाजाबद्दल संशयाचे वातावरण निर्माण होते.
   शाळा, दवाखाने चालवून सेवाकार्याच्या बुरख्याखाली आपल्या गरीब, अशिक्षित, दुर्बल बांधवांना ख्रिश्चन व मुसलमान करत आहेत.
कॅथॉलिक डिरेक्टरी १९९८ नुसार आज भारतात
१,१९,२५० विविध प्रकारचे मिशनरी आहेत. ७६,१५० सिस्टर्स आहेत. १५,१०९ शिक्षणसंस्था आहेत.  त्यात शिकणा-या विद्यार्थ्यांची संख्या ४७ लाख आहे.
   देशातील ३४ जिल्ह्यांत १०० टक्क्यांपेक्षा अधिक वेगाने ख्रिश्चनीकरण होत आहे. ८ जिल्ह्यात हा वेग ७५ % पेक्षा अधिक आहे. १५ जिल्ह्यात ४० टक्क्यांची वाढ आहे.
"प्रत्येक गावात चर्च आणि प्रत्येक हातात बायबल" अशी घोषणा चर्चने दिली आहे.

महाकारस्थान -

हिंदूंच्या अस्तित्वावरच घाला घालू पाहणा-या चर्चचे हे फार मोठे आंतरराष्ट्रीय कारस्थान असावे असे वाटेल. अशा ब-याच घटना गेल्या दोन वर्षात घडल्या. बाँबस्फोटासारख्या दहशतवादी कारवाया स्वताच करायच्या पण आरोप मात्र संघ, विश्व हिंदू परिषद वा अन्य हिंदूंच्या संघटनांवर करायचे. वृत्रपत्रातून त्यांची बदनामी करायची, जगभर हिंदू समाजाला अवमानित करायचे. भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र शासन डळमळीत करायचे कारस्थान वाटत आहे.

या घटनांतील काही अशा:

१. मध्यप्रदेशातील झाबुआ येथे भिक्षुणींवर बलात्कार-आरोप बजरंग दंल आणि संघावर केला. मात्र बलात्कारी ख्रिस्ती व अन्य जनजातीय होते.

२. ओरिसात कथामल येथे एका ख्रिस्ती मुलीची व एका ख्रिस्ती मुलाची हत्या झाली. या प्रकरणी मृतांच्या नातेवाईकांना अटक झाली. पण आरोप बजरंग दलावर केला.

३. २२ डिसेंबर १९९९ ला सुरत जिल्ह्यातील हालमुडी या गावी राममंदिराचा शिलान्यास झाला. चर्च पाडून मंदिर बांधायची बातमी आली. वस्तुस्थिती अशी की, चर्च वेगळ्या ठिकाणी आहे आणि शिलान्यास वेेगळ्या ठिकाणी झाला.

४. मथुरेच्या सेंट डॉमिनीक हायस्कूलवर हल्ला-
कारण विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे, आरोप मात्र संघावर.

५. ग्रॅहम स्टेन्स व त्यांची दोन मुले यांची हत्या.
चर्च व काँग्रेसचे पुढारी यांनी बजरंग दलावर आरोप ठेवला. परंतु वाधवा आयोगाने १९९९ जुलै महिन्यात आपला अहवाल सादर केला.
त्यात म्हटले आहे कि, या प्रकरणात कोणत्याही हिंदू संघटनेचा हात नाही.

६. असोसिएटेड प्रेसची एक बातमी - एका मिशनरी अमेरिकन डॉक्टरवर हिंदू कट्टरतावाद्यांनी हल्ला केला. प्रत्यक्षात ती व्यक्ती ना अमेरिकन होती, ना डॉक्टर, ना मिशनरी.

७. बारीपाडा (ओरिसा) ३ फेब्रुवारी ९९ ला एका भिक्षुणीवर बलात्कार झाल्याची बातमी प्रकाशित झाली. स्थानिक ख्रिस्त्यांनी बजरंग दलावर आरोप केला. प्रत्यक्षात बलात्कार झालाच नाही, असे वैद्यकीय तपासात आढळले.

८. वायनाड (केरळ) बायबल चोरल्याची बातमी प्रकाशित झाली. वस्तुत: बायबल जागेवर होते.

९. या असत्य घटनांच्या मालिकेतच आंध्र व कर्नाटकातील चर्चमध्ये बाँबस्फोटही जोडले पाहिजे. या सर्व स्फोटात वापरलेल्या रसायनात विलक्षण साम्य होते. बजरंग दल, विश्व हिंदू परिषद व यांच्यावर तोंडसुख व लेखणीसुख घेतले होते. ८ जुलैला हुबळीे इथे चर्चमध्ये स्फोट झाल्यावर संशयाचे बोट हिंदू संघटनेकडेच वळवण्यात आले.

कारस्थानाचा गौप्यस्फोट -

परंतु दुस-याच दिवशी म्हणजे ९ जुलैला बंगलोरच्या चर्चमध्ये आणि एका मारूती व्हॅनमध्ये स्फोट झाला आणि कारस्थानाचे खरे रूप प्रकट झाले. व्हॅनच्या स्फोटात दोन मृत आणि एक जखमी झाला. मेलेल्यांची नावे जहिर व सिद्दीकी.  वाचलेला इब्राहिम. या इब्राहिमकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांना कारस्थानाचा उलघडा झाला.
   हा स्फोट "दीनदार अंजुमान" या संघटनेने घडविला होता. ह्या संघटनेचा प्रमुख सैय्यद जियाल्ला हसन हा पाकिस्तानातील पेशावरजवळ राहतो. इब्राहिम ह्या सैय्यदला भेटण्यासाठी पाकिस्तानात गेला होता. "दीनदार अंजुमान"चा सचिव सय्यद इक्बाल याला आंध्रमधील गोदावरी जिल्ह्यातील नलजारला अटक केली. त्याच्या स्कुटरमध्ये स्फोटासाठी वापरणारी द्रव्ये सापडली. त्याच्या व इब्राहिमच्या घरातून सापडलेल्या कागदपत्रांवरून पोलिसांनी या कारस्थानाचा पुरता उलघडा केला आहे. आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनीच पत्रकार परिषदेत दीनदार अंजुमानच्या ४ सदस्यांना अटक केल्याचे सांगितले. या स्फोटातील धागेदोरे त्रिपुरातील बॅप्टिस्ट चर्चच्या एका फादरपर्यंत जाऊन पोचतात.

दुर्बल हेच लक्ष्य -

ख्रिश्चन व मुस्लिम दोघांचेही हिंदू समाजातील दुर्बल वर्गावर विशेषत्वाने लक्ष आहे. वनवासी,
गिरीवासी, झोपडपट्यांत राहणारे गरीब हिंदू,
मागास जातीतील हिंदू, भोळ्या महिला यांना मंतातरित करण्याच्या विविध योजना कार्यान्वित असलेल्या दिसून येतात.

संदर्भ सुची - विचारधन - १६०, १६१, १६२.

रा. स्व. संघ आणि धर्मजागरण - ६, ७, ८, ९, १०, ११.

चित्रदालन -

Comments

Popular posts from this blog

दोन वाचाळवीर -

दोन तोंडे नको त्यावेळी उचकटली गेली आहेत. एक आहेत मुस्लिमांचे पार्ट टाईम कैवारी मौलाना जावेद अख्तर, आणि दुसरे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे रामभक्त सीताराम येचुरी. हे दोघेही डाव्या विचारांचे असल्यामुळे तोंड उचकटणे हा त्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे. भाषणस्वातंत्र्याबरोबर अभिव्यक्तीस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य, व्यक्तीस्वातंत्र्य हे त्यांचे अधिकार आहेत. विशेष म्हणजे ह्या अधिकारांची डाव्यांनी कधीच कदर केली नाही, नेहमीच त्यांची मुस्कटदाबी आणि अवहेलना केली. आता हे आयते मिळाल्याने फुकटची मिरासदारी मिरवत आहेत ! श्रीलंकेतील बाँबस्फोटानंतर मुस्लिम महिलांच्या बुरख्यावर बंदी घालण्यात आली, केरळमध्येसुद्धा बंदी घालण्यात आली. (केरळमध्ये माकपचे सरकार आहे) ३ मे २०१९ रोजी बुरख्याप्रमाणे घुंघटावर बंदी घालावी अशी हास्यास्पद मागणी मौलाना अख्तरांनी केली. सामनात मुस्लिम महिलांच्या बुरख्यावर मागणी घालावी, असा लेख आल्याने खळबळ माजली. त्यापुर्वी श्रीलंकेत अध्यादेश काढून सार्वजनिक ठिकाणी बुरखाबंदी केली, फ्रान्समध्येसुद्धा बुरखाबंदी आहे ! मुस्लिम महिलांनी बुरखा घालणे किंवा न घालणे हा त्यांचा प्रश्न आहे. अख्तर ह...

गुरूजींचे विचारधन : सत्य आणि विपर्यास - भाग ३

आक्षेप क्र. ३ - तिरंगा व राज्यघटनेला विरोध. प्रवाहपतितांची घसरगुंडी - उदाहरणार्थ आपल्या नेत्यांनी आपल्या देशासाठी एक ध्वज तयार केला. त्यांची प्रवाहपतित अवस्था, परानुकर...

परत गांधी आमचे सावरकर तुमचे -

नुकतीच एक बातमी वाचनात आली. ती म्हणजे, राजस्थानमधील अशोक गेहलोत सरकारने १० वी च्या शैक्षणिक अभ्यासक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी एक बदल केला आहे. राजस्थानमध्ये ज्या विचाराचं सरकार येतं, तसे बदल पाठ्यपुस्तकातील इतिहासात होतात. भाजपच्या काळात विस्तारात आणलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या इतिहासाला गेहलोत सरकारने कात्री लावली आहे. जेलमध्ये होणा-या त्रासाला कंटाळून वीर सावरकरांनी ब्रिटीशांकडे चारवेळा दयेची याचिका केली आणि सरकारच्या अनुसार काम करण्याची आणि स्वताला पोर्तुगालचा मुलगा असल्याचं सांगितल्याचा उल्लेख केला. ब्रिटीशांनी सावरकरांची याचिका स्वीकारून १९२१ साली त्यांना जेलमधून मुक्त केले. तिथून सुटल्यावर हिंदूमहासभेत प्रवेश करून देशाला हिंदूराष्ट्र बनविणयाची संकल्पना मांडली. दुस-या महायुद्धाच्या काळात ब्रिटीश सरकारला मदत केली. १९४२ च्या "भारत छोडो" या आंदोलनाला सावरकरांनी विरोध केला होता. तसेच महात्मा गांधींच्या हत्येमधील मुख्य आरोपी नथुराम गोडसेला मदत केल्याच्या आरोपाचाही खटला सुरू होता. त्यातून सावरकरांची मुक्तता झाली, अशा आशयाचा इतिहास शिकवला जाणार आहे. सावरकरांच्...