Skip to main content

गुढी उभारूया विजयाची

"शंभुराजांनी संस्कृतमध्ये ग्रंथ लिहीले आणि शुद्रांनाही संस्कृत शिकवले. म्हणूनच ब्राह्मणांनी मनुस्मृतीप्रमाणे त्यांची हत्या केली आणि त्यांचे कापलेले शिर भाल्याला टांगून सर्वत्र जत्रा काढली. त्यांच्या हत्येपुर्वी कधीही गुढी उभारली जात नव्हती. हा सण ब्राह्मणांच्या विजयाचे प्रतिक आहे त्याचा बहुजनांशी काडीचाही संबंध नाही." वाचून हसू आले ना ?
   अश्या पद्धतीचे संदेश संभाजी ब्रिगेडकडून पसरवले जातात. पुढच्या आठवड्यात गुढीपाडवा असल्याने विषारी वातावरण तयार करायची प्रक्रिया सुरू असेल.
   गुढीपाडवा इ.स. ७८ मध्ये सुरू झाला.
गौतमीपुत्र श्री सातकर्णीने शक राजा नहपानवर विजय मिळविला आणि त्या विजयाचे प्रतिक म्हणून गुढी उभारण्याचा कार्यक्रम सुरु झाला.
हा स्वातंत्र्यदिवस आहे, गौतमीपुत्राने सर्व महाराष्ट्र जिंकला होता. ज्या गावात शंभुराजांची हत्या झाली, जिथे अंत्यसंस्कार झाला त्या आजूबाजूच्या गावात आजही गुढी उभारली जाते. ज्या वर्षी शंभुराजांच्या हत्या झाली फक्त त्याचवर्षी गुढी उभारली गेली नाही.
   औरंगजेब हा कट्टर मुसलमान होता आणि हिंदुत्वाचा कडवा विरोधक होता, त्याला मनुस्मृतीचा आधार घ्यायची काय गरज होती ?
गुढीपाडव्याच्या एकदिवस अगोदर हत्या केली. कारण, गुढी उभारली जाऊ नये आणि समस्त हिंदू समाज आपल्याला शरण यावा. आता गुढी
न उभारून आपण औरंगजेबाला शरण जातोय असा अर्थ होतो, म्हणजे त्याच्या कारस्थानाला आपण साहाय्य करतोय.
   शंभुराजांच्या जन्मापुर्वीसुद्धा गुढीपाडवा साजरा व्हायचा. संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत
तुकाराम ह्यांची गुढीवरील वचने प्रसिद्ध आहेत.
पुर्वी गुढीवर तांब्या/कलश नव्हते तर गडू (गडवा) नावाचे जाड पितळेचे पात्र ठेवले जायचे. व्यक्तीगत आनंद साजरा करण्यासाठीही गुढी उभारली जायची. कडुलिंबच का ?
तर सगळ्यात जास्त औषधी वनस्पती म्हणून कडुलिंब घराजवळ त्याकाळी वाढविले जायचे.
कडुलिंब हा कधीही खाल्ला जात नसे म्हणून त्या सणाला त्याचे महत्व वाढले. साखरेच्या गाठीचा शोध अलीकडचा आहे.
  ह्या दिवशी वसंत ऋतुची सुरूवात होते. ह्या दिवशी हवामान समशीतोष्ण व उत्साहवर्धक असते. पाडव्याच्या दिवशीच झाडांना पालवी फुटते आणि वृक्षावल्ली टवटवीत राहते.
परत इतिहासाकडे वळूया...
   शंभुराजांच्या हत्येचा संबंध मनुस्मृतीशी जोडतात. ज्या पद्धतीने शंभुराजांची हत्या झाली त्याच पद्धतीने औरंगजेबाला आपला थोरला भाऊ दारा शुकोहची हत्या केली होती.
दाराची हत्या करायला कोण ब्राह्मण पुढे आला ? त्यावर आणि फाटे फोडताना विचारतात कि, गुढीपाडवा सण बाहेरच्या राज्यातला आहे, मग आपण का साजरा करावा ? मग दहीहंडी, दसरा, रक्षाबंधन, दिवाळी हे सण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. मग गुढी का चालत नाही ?
   आता ब्रिगेडींना काही प्रश्न -

१. शंभुराजांचे अधिक आयुष्य स्वकीयांची कारस्थाने व शत्रुंच्या कुरघोड्यांना तोंड देण्यात गेले. तर ते ब्राह्मणेत्तरांना संस्कृत कधी शिकवणार ? ते काही समाजसुधारक होते ?

२. रामायण लिहीणारे ऋषि वाल्मिकी व महाभारत लिहीणारे महर्षी व्यास ह्यांनीसुध्दा संस्कृत भाषेतून लिखाण केले. मग त्यांची हत्या का झाली नाही ? उलट ब्राह्मण त्यांचे ग्रंथ शिरसावंद्य मानतात, असे का ?

३. हत्येचा आनंद साजरा करण्यासाठी गुढी उभारली जात होती तर त्यावेळी महाराणी ताराबाई, राजाराम महाराज, संताजी-धनाजी हे झोपले होते का ?

४. ब्राह्मणांचे ऐकायला रयत दुधखूळी होती का ?

५. ब्राह्मणांच्या सांगण्यावरून स्वताच्या राजाचा
बलिदान दिवस आनंदोत्सव म्हणून साजरा करायला त्यांचे वंशज काय मुघलांची औलाद होते का ?

गुढीपाडवा मोठ्या जल्लोषात साजरा करूया, कारण ते आपल्या विजयाचे प्रतिक आहे.
आता तुम्हीच ठरवा कि, गुढी न उभारून औरंगजेबाला शरण जायचे का गुढी उभारून शंभुराजांना श्रद्धांजली वाहायची !

- मिहीर कुलकर्णी.
  

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

दोन वाचाळवीर -

दोन तोंडे नको त्यावेळी उचकटली गेली आहेत. एक आहेत मुस्लिमांचे पार्ट टाईम कैवारी मौलाना जावेद अख्तर, आणि दुसरे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे रामभक्त सीताराम येचुरी. हे दोघेही डाव्या विचारांचे असल्यामुळे तोंड उचकटणे हा त्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे. भाषणस्वातंत्र्याबरोबर अभिव्यक्तीस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य, व्यक्तीस्वातंत्र्य हे त्यांचे अधिकार आहेत. विशेष म्हणजे ह्या अधिकारांची डाव्यांनी कधीच कदर केली नाही, नेहमीच त्यांची मुस्कटदाबी आणि अवहेलना केली. आता हे आयते मिळाल्याने फुकटची मिरासदारी मिरवत आहेत ! श्रीलंकेतील बाँबस्फोटानंतर मुस्लिम महिलांच्या बुरख्यावर बंदी घालण्यात आली, केरळमध्येसुद्धा बंदी घालण्यात आली. (केरळमध्ये माकपचे सरकार आहे) ३ मे २०१९ रोजी बुरख्याप्रमाणे घुंघटावर बंदी घालावी अशी हास्यास्पद मागणी मौलाना अख्तरांनी केली. सामनात मुस्लिम महिलांच्या बुरख्यावर मागणी घालावी, असा लेख आल्याने खळबळ माजली. त्यापुर्वी श्रीलंकेत अध्यादेश काढून सार्वजनिक ठिकाणी बुरखाबंदी केली, फ्रान्समध्येसुद्धा बुरखाबंदी आहे ! मुस्लिम महिलांनी बुरखा घालणे किंवा न घालणे हा त्यांचा प्रश्न आहे. अख्तर ह...

परत गांधी आमचे सावरकर तुमचे -

नुकतीच एक बातमी वाचनात आली. ती म्हणजे, राजस्थानमधील अशोक गेहलोत सरकारने १० वी च्या शैक्षणिक अभ्यासक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी एक बदल केला आहे. राजस्थानमध्ये ज्या विचाराचं सरकार येतं, तसे बदल पाठ्यपुस्तकातील इतिहासात होतात. भाजपच्या काळात विस्तारात आणलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या इतिहासाला गेहलोत सरकारने कात्री लावली आहे. जेलमध्ये होणा-या त्रासाला कंटाळून वीर सावरकरांनी ब्रिटीशांकडे चारवेळा दयेची याचिका केली आणि सरकारच्या अनुसार काम करण्याची आणि स्वताला पोर्तुगालचा मुलगा असल्याचं सांगितल्याचा उल्लेख केला. ब्रिटीशांनी सावरकरांची याचिका स्वीकारून १९२१ साली त्यांना जेलमधून मुक्त केले. तिथून सुटल्यावर हिंदूमहासभेत प्रवेश करून देशाला हिंदूराष्ट्र बनविणयाची संकल्पना मांडली. दुस-या महायुद्धाच्या काळात ब्रिटीश सरकारला मदत केली. १९४२ च्या "भारत छोडो" या आंदोलनाला सावरकरांनी विरोध केला होता. तसेच महात्मा गांधींच्या हत्येमधील मुख्य आरोपी नथुराम गोडसेला मदत केल्याच्या आरोपाचाही खटला सुरू होता. त्यातून सावरकरांची मुक्तता झाली, अशा आशयाचा इतिहास शिकवला जाणार आहे. सावरकरांच्...

गुरूजींचे विचारधन : सत्य आणि विपर्यास - भाग १

नमस्कार मित्रांनो ! गेले काही दिवस मी "विचारधन" (बंच ऑफ थॉट्स) ह्या ग्रंथाचे वाचन करत होतो. हा ग्रंथ द्वितीय सरसंघचालक प.पु. मा. स. गोळवलकर तथा श्रीगुरूजी ह्यांनी लिहीला आहे. ह्...