Skip to main content

मकर संक्रांत

आता नुकताच हा उत्सव पार पाडला, संघाच्या ६ उत्सवातील क्रमाने येणारा शेवटचा उत्सव.
दक्षिणायन संपुन उत्तरायण सुरू होते. सुर्याचा
मकर राशीत प्रवेश होतो. संक्रांत म्हणजे "सदमार्गावरून केलेली क्रांती होय".
   या दिवसापासून रात्र लहान व दिवस मोठा होतो. अंधार संपुन प्रकाशाकडे वाटचाल, असत्याकडून सत्याकडे, अज्ञानाकडून ज्ञानाकडे, नाकर्तेपणाकडून कर्तेपणाकडे,
असत्याकडून सत्याकडे, आनंदाकडे स्फुर्ती घेवून काम करण्याचा प्रवास सुरू होणारा व
सामाजिक क्रांती घडविणारा दिवस.
   व्यावहारिक अर्थाने आपण कौटुंबिक स्तरावर व मित्र मंडळींना तिळगुळ देऊन गोड बोलण्याचे
आवाहन करतो. परंतु "वसुधैव कुटूंबकम" या अनुशंगाने आपला संघ हे विश्वची माझे घर मानत असल्याने "व्यक्ती व्यक्ती जमवून भवती जागृत करणे तयाप्रती" हे ब्रीद सत्यतेत उतरवण्यासाठी अशा उत्सवांचा आपण उपयोग
करतो. उत्सव कोणताही असो, आपले हितचिंतक, विचार जाणून घेणारे, स्वयंसेवकांचे
पालक आणि जे जे आपल्या संपर्कात येतात अशा सर्वजणांना घरोघरी संपर्क करून आपण अशा उत्सवांकरिता संघस्थानावर एकत्र करून संघविचार, कार्यपद्धती, समाजोपयोगी कामे,
समाज व देशासमोरील आव्हाने यांचा चिंतनात्मक उहापोह करत असतो. यानिमित्ताने
नवनवीन  व्यक्ती संघाच्या संपर्कात येतात व
संघ जाणून घेत असतात.
   आज या सर्व गोष्टींचा उल्लेख करताना आजचे
सामाजिक चित्र याची विशेष करून चिंता करण्याची गरज भासत आहे. देशासमोरील दृश्य व अदृश्य आव्हाने व त्यावर मात करण्यासाठी जिवापाड प्रयत्न करत असलेले शासन हे एका बाजूला व त्याचवेळी देशांतर्गत समाजविघातक शक्ती ह्या वर्तमानात डोकं वर काढताना दिसतात. आज समाजात नको तितक्या प्रमाणात द्वेषभावना वाढीस लागली आहे.
   आज समाज हा जाती-जातींमध्ये, धर्म-धर्मांमध्ये, सवर्ण व मागासवर्गामध्ये, श्रीमंत व गरीबांमध्ये पराकोटीच्या द्वेषमूलक परिस्थितीत
दिसत आहे. आज देशामध्ये समाजविघातक शक्ती नको तितक्या प्रमाणात सक्रीय झाल्या आहेत. या शक्तींनी एखाद्या समाज घटकावर
एखादी भूमिका घेताना आपण देशाचे, समाजाचे
किती नुकसान करत आहोत याचे भान नसते.
   इलेक्ट्रॉनिक मिडीया व महापुरूषांची नावे घेऊन ढोंगी पुरोगामी व तथाकथित बुद्धीवादी
हे आपला विवेक गमावल्याचे जाणवते. एखादी
विचारधारा काळाच्या ओघात नाकारली जाऊ शकते किंवा नष्ट होऊ शकते हे वास्तव त्यांच्या
पचनी पडत नाही. त्यामुळे अशा विकृत शक्ती आपली दुकाने चालविण्यासाठी प्रसंगी देशहिताचा बळी देतात. हे आपण जेएनयु प्रकरण, नोटबंदीला विरोध, राम गणेश गडकरी प्रकरण, नुकतीच भीमा कोरेगाववरून झालेली
दंगल. या सर्वांचा उल्लेख आपल्यै चिंतनामध्ये करणे अनिवार्य आहे. कारण देश व समाजासमोरील सर्व आव्हानांची जाण ठेवून
देशहित, समाजहित हे समस्त हिंदू समाजाचे
संघटन कशापद्धतीने जोपासता येईल याचा विचार करणे क्रमप्राप्त आहे.
   या देशाच्या जडणघडणीत ज्या ज्या महापुरूषांचे व इतिहासामध्ये ज्या ज्या विभूतींचे
कर्तृत्व झळकले अशा सर्वांचा सन्मान राखून त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आगामी काळात योग्य त्या मार्गावर वाटचाल करण्यासाठी या
मकर संक्रांतीच्या उत्सवाच्या निमीत्ताने विचारमंथन करुया - मिहीर कुलकर्णी.
  

Comments

Popular posts from this blog

दोन वाचाळवीर -

दोन तोंडे नको त्यावेळी उचकटली गेली आहेत. एक आहेत मुस्लिमांचे पार्ट टाईम कैवारी मौलाना जावेद अख्तर, आणि दुसरे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे रामभक्त सीताराम येचुरी. हे दोघेही डाव्या विचारांचे असल्यामुळे तोंड उचकटणे हा त्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे. भाषणस्वातंत्र्याबरोबर अभिव्यक्तीस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य, व्यक्तीस्वातंत्र्य हे त्यांचे अधिकार आहेत. विशेष म्हणजे ह्या अधिकारांची डाव्यांनी कधीच कदर केली नाही, नेहमीच त्यांची मुस्कटदाबी आणि अवहेलना केली. आता हे आयते मिळाल्याने फुकटची मिरासदारी मिरवत आहेत ! श्रीलंकेतील बाँबस्फोटानंतर मुस्लिम महिलांच्या बुरख्यावर बंदी घालण्यात आली, केरळमध्येसुद्धा बंदी घालण्यात आली. (केरळमध्ये माकपचे सरकार आहे) ३ मे २०१९ रोजी बुरख्याप्रमाणे घुंघटावर बंदी घालावी अशी हास्यास्पद मागणी मौलाना अख्तरांनी केली. सामनात मुस्लिम महिलांच्या बुरख्यावर मागणी घालावी, असा लेख आल्याने खळबळ माजली. त्यापुर्वी श्रीलंकेत अध्यादेश काढून सार्वजनिक ठिकाणी बुरखाबंदी केली, फ्रान्समध्येसुद्धा बुरखाबंदी आहे ! मुस्लिम महिलांनी बुरखा घालणे किंवा न घालणे हा त्यांचा प्रश्न आहे. अख्तर ह...

परत गांधी आमचे सावरकर तुमचे -

नुकतीच एक बातमी वाचनात आली. ती म्हणजे, राजस्थानमधील अशोक गेहलोत सरकारने १० वी च्या शैक्षणिक अभ्यासक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी एक बदल केला आहे. राजस्थानमध्ये ज्या विचाराचं सरकार येतं, तसे बदल पाठ्यपुस्तकातील इतिहासात होतात. भाजपच्या काळात विस्तारात आणलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या इतिहासाला गेहलोत सरकारने कात्री लावली आहे. जेलमध्ये होणा-या त्रासाला कंटाळून वीर सावरकरांनी ब्रिटीशांकडे चारवेळा दयेची याचिका केली आणि सरकारच्या अनुसार काम करण्याची आणि स्वताला पोर्तुगालचा मुलगा असल्याचं सांगितल्याचा उल्लेख केला. ब्रिटीशांनी सावरकरांची याचिका स्वीकारून १९२१ साली त्यांना जेलमधून मुक्त केले. तिथून सुटल्यावर हिंदूमहासभेत प्रवेश करून देशाला हिंदूराष्ट्र बनविणयाची संकल्पना मांडली. दुस-या महायुद्धाच्या काळात ब्रिटीश सरकारला मदत केली. १९४२ च्या "भारत छोडो" या आंदोलनाला सावरकरांनी विरोध केला होता. तसेच महात्मा गांधींच्या हत्येमधील मुख्य आरोपी नथुराम गोडसेला मदत केल्याच्या आरोपाचाही खटला सुरू होता. त्यातून सावरकरांची मुक्तता झाली, अशा आशयाचा इतिहास शिकवला जाणार आहे. सावरकरांच्...

गुरूजींचे विचारधन : सत्य आणि विपर्यास - भाग १

नमस्कार मित्रांनो ! गेले काही दिवस मी "विचारधन" (बंच ऑफ थॉट्स) ह्या ग्रंथाचे वाचन करत होतो. हा ग्रंथ द्वितीय सरसंघचालक प.पु. मा. स. गोळवलकर तथा श्रीगुरूजी ह्यांनी लिहीला आहे. ह्...