राष्ट्रीय स्वयंसेवक संघ -
हा प्रश्न प्रत्येकालाच पडतो. काहीजणांच्या मते,
संघ म्हणजे गोळवलकर गुरूजी, विचारधन, भाजप किंवा अन्य प्रमुख व्यक्ती !
खरंतर संघ म्हणजे मैदानावर दररोज
सकाळ-संध्याकाळ भरणारी शाखा -
जिथे लहान-मोठा, श्रीमंत-गरीब, धर्म, जात, वंश, भाषा, प्रदेश अशा क्षुद्र गोष्टींना महत्व न देता भारतमातेचे सुपूत्र ह्या नात्याने एकत्र येतात.
एकत्र खेळ, व्यायाम, योगासने, सांघिक गीत,
बोधकथा सांगणे ह्या गोष्टी अनुभवायच्या असतात. वाईट व्यसने, दुर्गुण दूर लोटून भगव्या
ध्वजासमोर चारित्र्याची, विकसित भारताची,
मातृभूमी व समस्त मानवजातीची सेवेची प्रार्थना
करतात.
संघ म्हणजे कार्यवाह व मुख्यशिक्षक -
प्रत्येक भारतीयांमध्ये नेतृत्वगुण व चांगले संस्कार व्हावे म्हणून शाखेवरील स्वयंसेवकांना
आई-वडिलांप्रमाणे जपणारे हे दोन शिलेदार.
ज्यांची नुकतीच मुसरूड फुटलेली असते, पण शाखेवर सर्वांचे आई वडिल होतात. गम्मत म्हणजे आपल्या घरी कधी कधी लहान मुलासारखा हट्ट करतात.
संघ म्हणजे गटनायक -
आपल्या परिसरातील राहणा-या स्वयंसेवकांची मोठ्या भावाप्रमाणे काळजी घेणार आणि वेळप्रसंगी चुकीच्या घटनांवर रागवणारा.
घरातील प्रसंगाची विचारपूस करणारा.
गटातील स्वयंसेवकांवर प्रेम करणारा.
एक असे नेतृत्व ज्याच्या सानिध्यात लोखंडाचे
सोने होते.
संघ म्हणजे स्वयंसेवक -
संघ म्हणजे प्रत्येक स्वयंसेवक. विद्यार्थी असेल
तर अभ्यास व व्यायाम भारतमातेच्या वैभवासाठी करणारा. पालक व कुटूंबाला देव मानून त्यांची मनोभावे सेवा करणारा.
प्रचंड शिस्तप्रिय असा बाल-तरूण.
व्यावसायिक असेल तर कमी वेळेत आपल्या
मातृभूमीसाठी काही वेळ खर्च करणारा.
आपल्या व्यवसायाशी प्रचंड नम्र व प्रामाणिक असणारा. आपल्या कुटूंबाची यशस्वीरित्या काळजी घेणारा आणि व्यसनांपासून दूर असा चारित्र्यवान व प्रगल्भ जो समर्पित आहे, विकसित भारताच्या ध्येयासाठी साठी व स्वपनपुर्तीसाठी.
प्रौढ व वृद्ध असेल तर अापल्या अनुभवावरून समाजाला प्रेम वाटणारा. असे लाखो ज्येष्ठ स्वयंसेवक आहेत ज्यांना आपल्या कुटूंब व राष्ट्राची जवाबदारी यशस्वीरित्या पार पाडत
कष्टाने व चारित्र्याने मिळवलेली संपत्ती मातृभूमीला समर्पित केली आहे.
शिशू, बाल, तरूण, प्रौढ, वृद्ध असा ,शिस्तप्रिय, चारित्र्यावान, समर्पित, राष्ट्रनिष्ठ असा स्वयंसेवक. ज्याचे आयुष्य संघकार्याने पावन झाले आहे तो म्हणजे संघ.
"बंधूंनो ! एक वेळ अशी नक्की येईल कि,
प्रत्येक भारतीय नागरिक होईल व संघ समाजात
विलीन होईल. मग संघाची आवश्यकता भासणार नाही". - मिहीर कुलकर्णी.
Comments
Post a Comment