Skip to main content

लाल दहशतवादाचे उच्चाटन व्हावे

केरळ राज्यात रा. स्व. संघाचे कार्य सगळ्यात जास्त चालते. पण गेली ७५ वर्षे मार्क्सवाद्यांच्या दडपशाही व हिंसाचारात ३०० हुन अधिक स्वयंसेवक हुतात्मा झाले.
गेली कित्येक वर्षे लाल गुंडांनी उच्छाद मांडलेला आहे.
ह्या वर्षभरात १८ स्वयंसेवकांची निर्घृण हत्या झाली,
१०० स्वयंसेवकांना कायमचे अपंगत्व आले, ५०० हुन अधिक घरांवर हल्ले झाले. हे लाल गुंड एकट्या व निशस्त्र स्वयंसेवकाला एकाकी गाठून हिणकस पध्दतीने ठार मारतात. ह्या गोष्टी आता किरकोळ बनल्या आहेत.
बहुतांशी पत्रकार डाव्यांचे पक्षपाती असल्याने ह्या घटनांची विशेष नोंद घेतली जात नाही.
      जागतिक इतिहासात पाहिले तर कळेल कि, कम्युनिस्टांनी आपल्या सर्व राजकीय विरोधकांचा संपुर्ण व सर्वकष विध्वंस केला आहे. "जो आपल्यापेक्षा वेगळे मत व्यक्त करेल तो आपला शत्रू; आणि शत्रूला जगायचा हक्क नाही", हे त्यांचे धोरण आहे. मग त्याच जागतिक विचारजंतांची री ओढण्या-या भारतीय कम्युनिस्टांकडून वेगळी काय अपेक्षा करायची ? आपल्या देशातील तथाकथित बुध्दीवादी आणि विचारवंत अन्य फुटकळ विषयांवर वारेमाप प्रवचन देतात. पण स्वयंसेवकांच्या हत्येचा विषय निघताच शहामृगासारखी वाळूत चोच खुपसून बसतात.  
   असहिष्णूतेच्या नावाने गळा काढणारे, पुरस्कार परत करणारे, देश सोडायची धमकी देणारे मुक गिळून गप्प बसले आहेत. दहशतवाद्यांच्या मानवी हक्कासाठी लढणा-या अरूंधती रॉय, आणि राजदीप सरदेसारई, बरखा दत्त, शोभा डे, तसेच याकूब मेननची फाशी रद्द होण्यासाठी अर्ज करणारे महेश भट व नसिरूद्दीन शाह आता कुठे आहेत ? इथे राजरोसपणे स्वयंसेवकांच्या देहाची खांडोळी केली जाते, मात्र कुणाच्याही तोंडातून ब्र निघत नाही. आपले तथाकथित उदारमतवादी आपल्याच विश्वात मश्गूल आहेत. देशात जरा काही झाले कि त्याच्याविरोधात बेंबीच्या देठापासून ओरडतात. ह्यांना मानवाधिकारी कार्यकर्ते म्हणावे कि दानवाधिकारी असा प्रश्न निर्माण झाला आहे.
लोकशाही मोडून काढण्यासाठी नक्षलवाद, माओवादासारख्या राष्ट्रविघातक चळवळींना जन्म देणारे डावे आज संघाला फँसिस्टवादी म्हणत आहेत.
   मार्क्सवादी हिंसाचाराला स्वयंसेवकांच्या माता भगिनीसुध्दा बळी पडतात. त्यांचा विनयभंग व छेडछाड करण्याचे नित्य प्रकार लाल गुंड करतात.
त्याचबरोबर स्वयंसेवकांना आर्थिकदृष्ट्या अपंग बनविण्यासाठी त्यांच्या घरांना व शेतांना आग लावणे,
वाहनांची नासधूस करणे अशा उपाययोजना केल्या जातात. तरीदेखील संघ बिथरलेला नाही, अशा प्रतिकूल वातावरणात ५००० शाखा नियमित लावल्या जातात. ह्या वातावरणात स्वयंसेवक १५ दिवस तरी प्रवास करत असतात. केरळचे राजकारण व समाजकारण हळूहळू पण निश्चितपणे बदलत आहे.
म्हणूनच डाव्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.
   १ मार्च २०१७ रोजी देशव्यापी धरणे आंदोलन करून डाव्यांचे राक्षसी स्वरूप रा. स्व. संघाने संर्व भारतीयांपुढे आणले. स्वयंसेवकांचे हत्यासत्र म्हणजे कम्युनिस्ट काळसर्पाचे शेवटचे आचके असतील.
- मिहीर कुलकर्णी.  

Comments

Popular posts from this blog

दोन वाचाळवीर -

दोन तोंडे नको त्यावेळी उचकटली गेली आहेत. एक आहेत मुस्लिमांचे पार्ट टाईम कैवारी मौलाना जावेद अख्तर, आणि दुसरे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे रामभक्त सीताराम येचुरी. हे दोघेही डाव्या विचारांचे असल्यामुळे तोंड उचकटणे हा त्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे. भाषणस्वातंत्र्याबरोबर अभिव्यक्तीस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य, व्यक्तीस्वातंत्र्य हे त्यांचे अधिकार आहेत. विशेष म्हणजे ह्या अधिकारांची डाव्यांनी कधीच कदर केली नाही, नेहमीच त्यांची मुस्कटदाबी आणि अवहेलना केली. आता हे आयते मिळाल्याने फुकटची मिरासदारी मिरवत आहेत ! श्रीलंकेतील बाँबस्फोटानंतर मुस्लिम महिलांच्या बुरख्यावर बंदी घालण्यात आली, केरळमध्येसुद्धा बंदी घालण्यात आली. (केरळमध्ये माकपचे सरकार आहे) ३ मे २०१९ रोजी बुरख्याप्रमाणे घुंघटावर बंदी घालावी अशी हास्यास्पद मागणी मौलाना अख्तरांनी केली. सामनात मुस्लिम महिलांच्या बुरख्यावर मागणी घालावी, असा लेख आल्याने खळबळ माजली. त्यापुर्वी श्रीलंकेत अध्यादेश काढून सार्वजनिक ठिकाणी बुरखाबंदी केली, फ्रान्समध्येसुद्धा बुरखाबंदी आहे ! मुस्लिम महिलांनी बुरखा घालणे किंवा न घालणे हा त्यांचा प्रश्न आहे. अख्तर ह...

परत गांधी आमचे सावरकर तुमचे -

नुकतीच एक बातमी वाचनात आली. ती म्हणजे, राजस्थानमधील अशोक गेहलोत सरकारने १० वी च्या शैक्षणिक अभ्यासक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी एक बदल केला आहे. राजस्थानमध्ये ज्या विचाराचं सरकार येतं, तसे बदल पाठ्यपुस्तकातील इतिहासात होतात. भाजपच्या काळात विस्तारात आणलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या इतिहासाला गेहलोत सरकारने कात्री लावली आहे. जेलमध्ये होणा-या त्रासाला कंटाळून वीर सावरकरांनी ब्रिटीशांकडे चारवेळा दयेची याचिका केली आणि सरकारच्या अनुसार काम करण्याची आणि स्वताला पोर्तुगालचा मुलगा असल्याचं सांगितल्याचा उल्लेख केला. ब्रिटीशांनी सावरकरांची याचिका स्वीकारून १९२१ साली त्यांना जेलमधून मुक्त केले. तिथून सुटल्यावर हिंदूमहासभेत प्रवेश करून देशाला हिंदूराष्ट्र बनविणयाची संकल्पना मांडली. दुस-या महायुद्धाच्या काळात ब्रिटीश सरकारला मदत केली. १९४२ च्या "भारत छोडो" या आंदोलनाला सावरकरांनी विरोध केला होता. तसेच महात्मा गांधींच्या हत्येमधील मुख्य आरोपी नथुराम गोडसेला मदत केल्याच्या आरोपाचाही खटला सुरू होता. त्यातून सावरकरांची मुक्तता झाली, अशा आशयाचा इतिहास शिकवला जाणार आहे. सावरकरांच्...

गुरूजींचे विचारधन : सत्य आणि विपर्यास - भाग १

नमस्कार मित्रांनो ! गेले काही दिवस मी "विचारधन" (बंच ऑफ थॉट्स) ह्या ग्रंथाचे वाचन करत होतो. हा ग्रंथ द्वितीय सरसंघचालक प.पु. मा. स. गोळवलकर तथा श्रीगुरूजी ह्यांनी लिहीला आहे. ह्...