अंतर्गत धोका (कम्युनिस्ट) - साम्यवादाचे वाढते संकट हे आपल्या देशातील लोकशाहीच्या गंभीर अपयशाचे द्योतक आहे. साम्यवाद व लोकशाही यांचे जन्मजात हाडवैर आहे. आर्थिक प्रश्नांबाबत सामान्य जनतेला साम्यवादाचे आकर्षक वाटते, हे पाहुन आपण कम्युनिस्टांच्या मागे राहु नये या हेतूने आपल्या नेत्यांनी कम्युनिस्टांची भाषा व कार्यक्रम यांचा स्वीकार केला, आणि अशाप्रकारे साम्यवादाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. अशा प्रकारच्या डावपेचांनी कम्युनिस्टांच्या शिडातील हवा काढून घेता येईल अशी ह्या नेत्यांची कल्पना असेल तर तो त्यांचा फार मोठा भम्र आहे. आज देशभक्ती, चारित्र्य, ज्ञान यांसारख्या श्रेष्ठ गुणांचे आवाहन कोणीच करत नाही; (हे सर्व पोट भरल्यानंतर करता येईल, मुर्खपर्णा) सांस्कृतिक, बौद्धीक, नैतिक विकासवरही कणाचा भर नाही. अशा प्रकारच्या दुबळ्या व विफल मनात साम्यवादाचे बीज लगेच मुळ धरते. निष्ठांचा अंत : साम्यवादाचा उदय - मनुष्य केवळ भाकरीवर जगत नाही. (आणि भाकरीशिवायही जगू शकत नाही) ज्याच्यासाठी जगावे किंवा मरावे अशी काही जीवननिष्ठाही असावी लागते. अशी एखादी जीवननिष्ठा नसेल तर जीवनाला कोणतीही दि...