नमस्कार मित्रांनो ! मागच्यावेळी मी गुरूजींचे विचारधन - भाग १ प्रकाशित केला होता. आता भाग २ दुसरा प्रकाशित करत आहे. आक्षेप क्र. २ - अंतर्गत धोका (मुसलमान, ख्रिश्चन, कम्युनिस्ट) अंतर्गत धोका (मुसलमान) - जगातील अनेक देशांच्या इतिहासावरून एक कठोर सत्य निदर्शनास येते. ते हे कि, राष्ट्रीय सुरक्षिततेला बाहेरील आक्रमकांपेक्षा अंतर्गत विरोधी शक्ती पासून अधिक धोका असतो. परंतु दुर्दैव असे कि, ब्रिटीश लोक येथून निघून गेले तेंव्हापासून राष्ट्रीय सुरक्षिततेच्यासंबंधी या पहिल्या पाठाकडे सतत दुर्लक्ष होत आले आहे. सर्वप्रथम आपण मुसलमानांच्या प्रश्नासंबंधी विचार करू. आजही अनेकजण असे म्हणताना आढळतात कि, "आता मुसलमानांचा प्रश्नच शिल्लक राहिलेला नाही. ज्या दंगलखोर मुसलमानांनी पाकिस्तानचा पुरस्कार केला ते सर्वजण आता येथून कायमचे निघून गेले आहेत. राहिलेले मुसलमान ह्या देशाशी एकनिष्ठ आहेत. आता त्यांना जाण्यासाठी अन्य स्थानही राहिलेले नाही. त्यामुळे ते ह्या देशाशी एकनिष्ठच राहणार". काही बोलकी उदाहरणे - महाराष्ट्रातील मालेगाव शहरात १९६३ साली दंगा झाला. गणपती विसर्जनाची मिरवणुक चालली होती. मुसल...